पूर्णा येथे विवाहितेची फेसबुकरवर बदनामी केल्याप्रकरणी चौघांविरूद् गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2017 02:11 PM2017-11-25T14:11:24+5:302017-11-25T14:15:39+5:30

पूर्णा येथील एका २० वर्षीय महिलेची फेसबुकवर बदनामी केल्याप्रकरणी नांदेड येथील चौघांजणाविरूद्ध न्यायालयाच्या आदेशावरून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

An FIR has been lodged against four persons for defamation of marriage | पूर्णा येथे विवाहितेची फेसबुकरवर बदनामी केल्याप्रकरणी चौघांविरूद् गुन्हा दाखल 

पूर्णा येथे विवाहितेची फेसबुकरवर बदनामी केल्याप्रकरणी चौघांविरूद् गुन्हा दाखल 

googlenewsNext

परभणी : पूर्णा येथील एका २० वर्षीय महिलेची फेसबुकवर बदनामी केल्याप्रकरणी नांदेड येथील चौघांजणाविरूद्ध न्यायालयाच्या आदेशावरून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.  पिडीतेने दुस-याशी लग्न केल्याचा राग मनात धरून या चोघांनी हे कृत्य केले असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पूर्णा येथे महात्मा फुले नगरातील एक २० वर्षीय महिला राहतात. त्या विवाहित असून त्यांनी नांदेड येथील शेख इम्रान शेख इसाक व शेख इशरत शेख इसाक यांच्याशी लग्न न केल्याने दोघांनी त्यांना २० ते २७ आॅक्टोबर २०१७ या कालावधीत मोबाईलवर फोन करून शिवीगाळ केली. तसेच एवढ्यावरच न थांबता शेख इम्रान शेख इसाक यांने पिडीत महिलेच्या पतीच्या फेसबुक अकाऊंटवर अश्लील भाषा वापर महिलेची बदनामी केली. 

यासोबतच पिडीतेचा संसार उद्धवस्त करण्याच्या हेतूने शेख इसाक शेख मुसा व शेख वसीम शेख इसाक यांनीही फेसबुकवर पिडीत महिला व तीच्या बहिणीवर आरोप लावत बदनामी केली. याप्रकरणी पिडीत महिलेने पूर्णा न्यायालयात धाव घेतली होती़ न्यायालयाने गुरुवारी (दि. २३) दिलेल्या निकालावरून पीडित महिलेच्या फिर्यादीवरून शेख इम्रान शेख इसाक (रा देगलूर नाका नांदेड), शेख इशरत शेख इसाक, शेख इसाक शेख मुसा, शेख वसीम शेख इसाक (सर्व रा हैदरबाग देगलुर नाका नांदेड) या चौघांविरूद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन मंडले करत आहेत.

Web Title: An FIR has been lodged against four persons for defamation of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.