परभणी जिल्ह्यात ५ टक्केच पीक कर्जाचे शेतकऱ्यांना वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 11:39 PM2019-06-22T23:39:36+5:302019-06-22T23:39:58+5:30

खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १४७० कोटी ४४ लाख रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट यावर्षी देण्यात आले आहे; परंतु, १५ जूनपर्यंत जिल्ह्यातील बँकांनी ११ हजार ८८१ शेतकºयांना ७१ कोटी ७० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यात केवळ ४.८८ टक्केच पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

Distribution of 5% of crop loan to farmers in Parbhani district | परभणी जिल्ह्यात ५ टक्केच पीक कर्जाचे शेतकऱ्यांना वाटप

परभणी जिल्ह्यात ५ टक्केच पीक कर्जाचे शेतकऱ्यांना वाटप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : खरीप हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १४७० कोटी ४४ लाख रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट यावर्षी देण्यात आले आहे; परंतु, १५ जूनपर्यंत जिल्ह्यातील बँकांनी ११ हजार ८८१ शेतकºयांना ७१ कोटी ७० लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यात केवळ ४.८८ टक्केच पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
गतवर्षी शेतकºयांनी उसणवारी करुन व बँकांमधून पीक कर्ज मिळेल, या आशेवर खरीप हंगामामध्ये पेरणी केली होती. लाखो रुपयांचा खर्च करून काळ्या आईची ओटी भरली होती; परंतु, जून व जुलै महिन्यानंतर जिल्ह्यात पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप हंगामात केलेली पेरणी धुळीस मिळाली. जिल्ह्यातील ६ तालुके राज्य शासनाच्या
गंभीर दुष्काळाच्या यादीमध्ये समाविष्ट झाले. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले.
या शेतकºयांच्या हातात सध्या छदामही नाही. त्यातच यावर्षीच्या खरीप हंगामात पेरणी कशी करावी? या विवंचनेत सध्या शेतकरी आहे. जिल्हा प्रशासनाने यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकºयांना पेरणीसाठी पैसे उपलब्ध व्हावेत, यासाठी १४७० कोटी ४४ लाख रुपये पीक कर्जाचे उद्दिष्ट बँकांना दिले आहे.
१५ जूनपर्यंत जिल्ह्यातील बँकांनी ४.८८ टक्के पीक कर्ज वाटप करीत ११ हजार ८८१ शेतकºयांना ७१ कोटी ७० लाख रुपयांचा लाभ दिला आहे. यामध्ये व्यावसायिक बँकांनी ३ हजार २०१ शेतकºयांना ३६ कोटी १५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करीत ३.४४ टक्केचे उद्दिष्ट गाठले आहे. त्याचबरोबर खाजगी बँकांनी ६९४ शेतकºयांना ८ कोटी ४८ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करीत १६.१६ टक्के उद्दिष्ट गाठले आहे. महाराष्टÑ ग्रामीण बँकेने ८१३ शेतकºयांना ७ कोटी २ लाख रुपयांच्या रक्कमेचे वाटप करून सर्वात कमी ३.५१ टक्के उद्दिष्ट गाठले आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेने सर्वाधिक ७ हजार १७३ शेतकºयांना २० कोटी ५ लाख रुपयांची रक्कम वाटप करीत १२.१२ टक्के उद्दिष्ट गाठले आहे.
दरम्यान, खरीप हंगामातील बहुतांश ठिकाणी पेरणी सुरू झाली असतानाही बँकांंनी मात्र पीक कर्ज वाटपासाठी आखडता हात घेतला आहे. ऐन पेरणीच्या हंगामात पीक कर्ज मिळविण्यासाठी शेतकºयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जिल्हाधिकाºयांनी लक्ष देण्याची मागणी
जिल्ह्यात खरीप हंगामाचा मौसम सुरु झाला आहे. त्यामुळे शेतकरी बी बियाणे खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी करीत आहेत; परंतु, गतवर्षीच्या दुष्काळाचे संकट पचवून यावर्षीच्या खरीप हंगामाची तयारी करण्यासाठी शेतकºयांकडे छदामही उपलब्ध नाही. त्यामुळे बँकांनी शेतकºयांना उभारी देण्यासाठी पीक कर्जाची गती वाढवावी, यासाठी जिल्हाधिकाºयांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Distribution of 5% of crop loan to farmers in Parbhani district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.