हो, तुम्हाला कमी ऐकू येतंय. - खोटं वाटतंय?

By admin | Published: April 26, 2017 04:48 PM2017-04-26T16:48:13+5:302017-04-26T16:48:13+5:30

तपासा स्वत:ला.दूध का दूध, पाणी का पाणी..

Yes, you hear less. - Do you feel bad? | हो, तुम्हाला कमी ऐकू येतंय. - खोटं वाटतंय?

हो, तुम्हाला कमी ऐकू येतंय. - खोटं वाटतंय?

Next

 - मयूर पठाडे

 
कानठळ्या बसवणारे आवाज, रस्त्यावरचा गोंगाट, गडबड-गोंधळ, प्रत्येक ठिकाणाहून हरघडी येणारे कर्णकर्कश आणि कंठाळी आवाज.. 
 
त्यासाठी जबाबदार अनेक कारणं असली तरी यात तरुणांचाही वाटा मोठा आहे हे नाकारुन चालणार नाही.
 
हा तर आमच्या जगण्याचाच एक भाग आहे.
 
त्यामुळे काय एवढं बिघडतं, असं कोणी म्हणेल, पण.
 
या कंठाळी आवाजांचा आपल्याला सराव झाला असला आणि या आवाजासह जगण्याची सवय आपण स्वत:ला लावून घेतली असली तरी यामुळे खूप काही बिघडतं.
 
आज दिनांक 26 एप्रिल 2017. ‘जागतिक ध्वनि प्रदुषण जागरुकता दिवस’.
 
त्यानिमित्त आवाजानं नेमकं काय बिघडतं यावर हा प्रकाशझोत.
 
यासंदर्भाचा जागतिक अभ्यास सांगतो, जगातले तब्बल 360 दशलक्ष लोक कानांच्या विकारांनी त्रस्त आहेत. त्यात ‘आवाज’ हेच प्रमुख कारण आहे. कारण इतर कुठल्याही कारणानं त्यांच्यात बहिरेपणा आलेला नाही, तर रोज कानावर आदळणार्‍या आवाजांनी त्यांना बहिरेपण आणलं आहे.
 
जगाचं जाऊ द्या, भारताच्या संदर्भात ही आकडेवारी काय सांगते?..
 
 
नॅशनल सॅम्पल सव्र्हे तर यापुढे जाऊन सांगतं, भारतीय लोकांत जे काही व्यंग आहे, त्यातल्या तब्बल दुसर्‍या क्रमांकाचा वाटा बहिरेपणाचा आहे. शहरी भागात कानाचं हे अपंगत्व नऊ टक्के आहे, तर ग्रामीण भागात ते दहा टक्के आहे. 
 
कमी ऐकू आलं तर त्यानं काय बिघडतं? - हा प्रo्न आता तरी कोणी विचारणार नाही.
 
तरीही या कंठाळी आवाजाविरुद्ध काही गोष्टी करणं आपल्या हातात आहे. किमान तेवढं तरी आपण करायला हवं.
 
काय करता येईल?
कसं कराल आपल्या कानांचं संरक्षण?
 
वाचा इथेच.
 
उद्या.

Web Title: Yes, you hear less. - Do you feel bad?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.