परफेक्ट लूक हवाय?

By admin | Published: November 6, 2014 04:43 PM2014-11-06T16:43:01+5:302014-11-06T16:43:01+5:30

कपडे-चपला-बॅगा-मेकप कशावर काय घालायचं?

Want Perfect Lucas? | परफेक्ट लूक हवाय?

परफेक्ट लूक हवाय?

Next

कम्प्लिट परफेक्ट लूक हवा, असं अनेकांना वाटतं?

पण परफेक्ट लूक म्हणजे काय?
फक्त नवनवे-ब्रॅण्डेड कपडे घातले म्हणजे असा परफेक्ट लूक नाहीच मिळत, त्यासाठी करावं लागतं उत्तम पॅकेजिंग.
जमानाच आहे ‘पॅकेजिंग’चा. पॅकेजिंग उत्तम तर प्रेझेण्टेशनही उत्तम. जे प्रॉडक्टच्या बाबतीत आजच्या मार्केटिंगच्या जमान्यात खरं आहे तेच आपल्याही संदर्भात तितकेच महत्त्वाचं आहे. त्यामुळेच तुम्हाला जर परफेक्ट लूक  हवा असेल तर या काही गोष्टी नक्की करून पहा.
चपला-बॅग आणि गॉगल
आपण कपडे घेताना फार विचार करतो? पण बूट, बॅग, गॉगल, बेल्ट्स, टोपी, स्कार्फ हे सगळं घेताना काहीच म्हणजे काहीच विचार करत नाही. आवडलं म्हणून घेतो फार विचार न करता ! पण तुमच्या कपड्यांइतक्याच महत्त्वाच्या आहेत तुमच्या अँक्सेसरीज! त्या घेताना एकतर नॅचरल कलर तरी घ्या नाहीतर कॉण्ट्रास्ट तरी ! म्हणजे निळ्याबरोबर लाल, पिवळ्या बरोबर हिंरवा अशा जोड्या तयार करा.
नॅचरल कलर म्हणजे काळा, मोती, करडा, पांढरा. सिल्व्हर किंवा गोल्ड कलरही तुम्ही अधूनमधून वापरू शकता. वाट्टेल तसे कलर मिक्स करू नका. म्हणजे उदा. तुम्ही ब्राऊन कलरचे बूट घातले असतील तर ग्रे कलरचा पट्टा अजिबात वापरू नका. रंग निवडताना साधारण एकाच फॅमिलीतले निवडावेत. चमकिल्या सिल्वहर-गोल्ड अँक्सेसरीजही नेहमी वापरू नयेत. कॉण्ट्रास्ट कलर वापरताना ग्रीन, रेड, ब्ल्यू वापरा. पण एकाचवेळी अनेक रंग वापरू नका. प्लेन कपडे आणि मोठय़ा प्रिण्टची बॅग किंवा स्कार्फ एवढंही परफेक्ट लूक देऊ शकतो.
दागिने किती घालाल?
दागिन्यांचे तर काय शेकडोने मिळतात, असतातही आपल्याकडे ! पण कशावर काय घालायचं हे कळत नाही. तुम्ही जर बोल्ड प्रिण्टचा, हेवी वर्क असलेला ड्रेस घालणार असणार तर त्यावर चमकिले दागिने अजिबात घालू नका. दागिनेच उठून दिसतात तुम्ही नाही असं होऊ नये. त्याचप्रमाणं पारंपरिक सोन्याचे दागिने, प्लास्टिक किंवा ग्लासच्या दागिन्यांसोबत एकाचवेळी घालू नका.
केसांचं करायचं काय?
सगळ्यात मोठा आणि जटील प्रश्न. तरुण मुलं काही प्रत्येकवेळेस हेअरस्टाइल बदलू शकत नाही. मुलींना तो तरी ऑप्शन असतो. त्यामुळे तरुणांनी एकदाच चांगला, स्मार्ट दिसेल असा हेअरकट करून घ्यावा. हेअर जेल वापरून तुम्ही वेळोवेळी केसांना वेगळा लूक देऊ शकता.
मुलींसाठी मात्र केस हा फार अवघड प्रश्न. तुमचे कपडे, कट्स, कलर्स याबरोबर तुमचा हेअरकट शोभला पाहिजे. त्यामुळे आपण केस कसे सांभाळू शकतो, याचा विचार करुन केसांवर प्रयोग करा. उत्तम हेअरकट, स्ट्रेटनिंग, कर्ली जे हवं ते करता येतं. मात्र केस सुंदर दिसले तर लूक चांगला दिसतो हे लक्षात ठेवावं.
मेकप रोज करावा का?
मेकप करावा पण किती?
आपला खरा चेहरा लपून फारच खोटं काहीतरी दिसेल इतका मेकप करू नये. मेकप केल्यावरही तुमचा रिअल फेस कायम दिसला पाहिजे. फक्त हायलाइट करण्याइतपत मेकप करावा. डोळे, गाल, पापण्या यांच्यावर मेकप चांगला दिसतो. कपडे डार्क कलरचे असतील तर मेकप साधा हवा. नाहीतर त्याउलट. आपण योग्य फाउंडेशन वापरतोय हे पहा. गोरं दिसण्यासाठी फाउंडेशन वापरू नये.
मेकपचे थर कायम वाईटच दिसतात. मिनिमम पण योग्य मेकप करणं कधीही चांगलंच.
- प्राची खाडे 
स्टायलिस्ट आणि पर्सनल शॉपर

Web Title: Want Perfect Lucas?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.