ठाकूर, तुम बचके रहियो!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 03:22 PM2018-03-22T15:22:40+5:302018-03-22T15:22:40+5:30

बिग डाटा हा शब्द ऐकलाय तुम्ही? तो आपल्या अवतीभोवती घोंघावतोय. आपल्या घरात पोहचलाय.. त्याची रूपं दिसताहेत का पहा..

Thakur, you stay child! | ठाकूर, तुम बचके रहियो!

ठाकूर, तुम बचके रहियो!

Next

- डॉ. भूषण केळकर
बिग डाटा. हा शब्द हल्ली तुम्ही वारंवार ऐकता. बिग डाटाबद्दल सांगण्याआधी मला गेल्या आठवड्यातील ५ ठळक घटना (ज्या तुम्हीपण वाचल्या असतील) तुमच्या समोर मांडायच्या आहेत. त्या सर्वात एआयचा अन्योन्य संबंध आहे. ज्यायोगे आपण इंडस्ट्री ४.० काय आहे हे अधोरेखित होईल.
पहिली बातमी म्हणजे अमेरिकेतील ‘टॉयरस’ नावाची खेळण्यांची अग्रगण्य कंपनी बंद होणार ही झालेली घोषणा. या घोषणेचा अर्थ म्हणजे ३०,००० लोकांच्या नोकरीवर कुºहाड! कारण काय तर लोक आता आॅनलाइन शॉपिंग करतात आणि दुकानात कोणी फिरकत नाही. एआयवर आधारित कंपन्यांमुळे, आॅनलाइन खरेदीमुळे!!
दुसरी बातमी स्टीफन हॉकिंग. त्यांचे निधन झाले. त्याच्या निधनानं मानवी प्रगतीमध्ये ‘कृष्णविवर’ तयार झालंय हे तर खरंच; पण ते म्हणत की, ‘‘ग्लोबल वॉर्मिंग आणि एआय यामुळे मानवाने पुढील १००-१५० वर्षात पृथ्वी सोडून दुसऱ्या ग्रहावर वस्ती करावी, अन्यथा मानवाचं काही खरं नाही!’’
तिसरी बातमी. इलॉन मस्क म्हणजे टेस्ला या एआय आधारित इलेक्ट्रिक कारचा जनक म्हणतोय की, ‘‘एआय हे तंत्रज्ञान आण्विक शस्त्रांपेक्षा अधिक भयवह आहे!’’ हाच इलॉन मस्क जणू स्टीफन हॉकिंगकडून प्रेरणा घेतल्याप्रमाणे स्पेसेसक्स या प्रकल्पाद्वारे मंगळावर मानवी वस्ती होण्यासाठी प्रयत्नशील आहे !
चौथी बातमी मुंबईवर धडकलेल्या शेतकरी मोर्चाची. हवामानाच्या लहरीपणामुळे शेतकºयांचे जे नुकसान होतंय. त्यावर एआय वापरून उपायपण करता येईल, असा आशेचा किरणही असणारी. त्याविषयी अधिक लेखमालेत पुढे स्वतंत्र बघू.
पाचवी बातमी आहे ती पुण्यातल्या ‘पॉप्युलर बुक हाऊस’ व मुंबईतील ‘स्ट्रॅण्ड’ ही दोन पुस्तक विक्रीमधील मानबिंदू असणारी दुकानं बंद होण्याच्या घटनांची ! पुन्हा कारण तेच एआय व डिजिटल तंत्रज्ञानामुळे आॅनलाइनची चलती ! याचमुळे अमेरिकेतसुद्धा बॉर्डर नावाची पुस्तकांची दुकानं जवळजवळ ४०० बंद पडली आणि ११,००० लोकांच्या नोकºया गेल्या होत्या!
वरील ५ बातम्या अगदी ताज्या ताज्या हेच सांगतात की, ‘‘ठाकूर तुम बचके रहियो’’.
एआय आणि इंडस्ट्री ४.०ची दखल आपण वेळीच घेऊ या हे सांगणारे वरील ‘‘पाचामुखी परमेश्वर’’ मांडलं ते यासाठी!
तर बिग डाटा हा या इंडस्ट्री ४.०चा नावाप्रमाणे बिग, अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा भाग आहे. बिग डाटा याचं साधं स्पष्टीकरण देताना ५ व्ही सांगतात. व्हॉल्यूम म्हणजे जी माहिती तयार होते आहे ती अतिप्रचंड आहे. अंदाज येण्यासाठी सांगतो की, साधारण १.५ जीबीमध्ये २ तासाचा सिनेमा मावतो. सर्वसाधारण कंपन्यांमध्ये असे १ लाख सिनेमे मावतील एवढा डाटा आहे ! प्रत्येक कंपनीमध्ये !! हेच बघ ना, आपण एवढे फोन कॉल, एसएमएस, डाउनलोड करतो मोबाइलमध्ये तो सगळा डाटा कित्येक अब्ज लोकांचा केवढा असेल!
बिग डाटाचा दुसरा व्ही आहे तो वेलॉसिटी. अनेकविध उपग्रहांकडून येणारी माहिती, बँकांची माहिती आणि आपली मोबाइलची माहिती ज्या वेगाने तयार होते आणि त्या पृथक्करण करावे लागते तोही वेग!
बिग डाटाचा तिसरा ‘व्ही’ आहे तो व्हरायटी. पूर्वी माहिती ही टेक्स्ट्युअल आणि न्युमरिकल होती. आज ती चित्र, फोटो, आॅडिओ, व्हिडीओ, बोटांचे ठसे, स्पर्श, डोळ्यातील बाहुली इ. सर्व प्रकारची माहिती आहे.
सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे समाजमाध्यम व त्याची सर्वदूर व्याप्ती. दुसरं उदाहरण म्हणजे आधार ! आधारमध्ये तुमचे नाव, पत्ता इ. तुमचे वय, जन्मतारीख इ. आकडे एवढेच नाही तर बोटांचे ठसे, फोटो इ. असते.
चौथा व्ही आहे व्हेरासिटी. म्हणजे माहितीतील अनिश्चिता म्हणजे माहितीमध्ये असणारा नॉइज आणि सापेक्षता.
अलीकडेच ५वा व्ही बिग डाटामध्ये जोडला गेलाय तो म्हणजे व्हॅल्यू. माहितीतून मिळणारी ‘दृष्टी’!
इंडस्ट्री ४.० चा बिग डाटा हा पंचप्राण आहे, तो असा.

( लेखक आयटी तज्ज्ञ आहेत. bhooshankelkar@hotmail.com )

 

 

Web Title: Thakur, you stay child!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.