या नवरात्रात करा 10 लाइफ स्किल्सचं नवं व्रत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 05:40 PM2018-10-11T17:40:45+5:302018-10-11T17:40:52+5:30

जे काम यंत्र करतात, तेच माणूस करत राहिला तर यंत्र माणसांचा रोजगार खाऊन टाकणार! एवढंच कशाला, ऑफिसला वेळेवर नाही गेलं तर थेट नोकरीच जाणार, असा हा ‘बदलता’ काळ आहे. या काळात टिकायचंच नाही तर यशस्वीही व्हायचं असेल तर यंत्राच्या पुढे दोन पावलं टाकावी लागतील. ते करायचं म्हणून शक्तीची उपासना करणार्‍या या नवरात्रात नव्या लाइफ स्किलचं हे खास व्रत. यशस्वी सीमोल्लंघनासाठी!

This Navratri try to learn 10 new life skills, it will lead you to success. | या नवरात्रात करा 10 लाइफ स्किल्सचं नवं व्रत!

या नवरात्रात करा 10 लाइफ स्किल्सचं नवं व्रत!

Next
ठळक मुद्देनव्या कौशल्यांचं हे व्रत सुफळ संपूर्ण झालं तर जग जिंकता येईल!

- ऑक्सिजन टीम


काल घटस्थापना झाली. आता दसर्‍यार्पयत शक्तीची उपासना करण्याचं व्रत घरोघरी केलं जाईल. सृजनोत्सव म्हणतात या काळाला. नव्या गोष्टी शिकत आपणच आपल्या सीमा ओलांडत यशाचं सीमोल्लंघन करण्याची रीत शिकवणारं हे नवरात्र. गरबा-दांडिया, त्यातला उत्सव, आनंद हे सारं तर दरवर्षीप्रमाणं आपण सारे करूच. छान सजू, नटू. रात्री जागवू. स्वतर्‍ला विसरून नाचू. मात्र हे सारं करताना नव्या जगाचं ‘भान’ही आपल्याला हवं. विजयाचा दसरा साजरा करायचा तर कठोर परिश्रमांची, मेहनतीच्या व्रताची कासही धरता आली पाहिजे.
त्या दिशेनं निदान काही पावलं जाता यावं, निदान बदलत्या जगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक ते बाण आपल्या भात्यात आणावेत म्हणून प्रय} तर करायलाच हवेत.
ते प्रय} कोणत्या दिशेनं केले तर आपल्याला विजयाचा दसरा दिसू शकेल, याची ही एक चर्चा.
आपण दर दिवशी एक माळ पूजतो, देवीला वाहतो. तसेच हे 10 स्किल या अंकात देतो आहोत. 
बदलत्या काळात नुसतं करिअर करायचं म्हणून नाही तर अर्थपूर्ण, समाधानाचं आयुष्य जगायचं आणि स्वतर्‍ला समृद्ध करायचं तर आपल्याला ही काही कौशल्यं शिकून घ्यायला हवीत. तर आपल्याला समृद्धीची वाट सापडेल आणि असमाधानाची काजळी दूर ठेवण्यासाठीचे डोळस प्रयत्नही करता येतील.
आता कुणी विचारेल की, याची गरज काय?
वर्षानुवर्षे आपण शाळा-कॉलेजात जातो, अभ्यास करतो. डिग्य्रा घेतो, मग या नवीन स्किलची गरज काय?
तर त्याचं उत्तर आहे बदलतं जग, नवीन अर्थव्यवस्था आणि ऑटोमेशन नावाचा एक मोठा अजस्त्र वेगवान राक्षस मोठा होत जाताना त्याच्याशी करायची स्पर्धा.
ऑटोमेशन हा शब्द हल्ली परवलीचा झाला आहे. येत्या काळात ऑटोमेशनमुळे अनेक रोजगार जातील, अनेक नोकर्‍या जातील अशी चर्चाही कानावर येते. फक्त भारतातच नाही तर जगभर ऑटोमेशनच्या परिणामांची चर्चा होते आहे. त्यातून माणसांचं स्थलांतर, बेरोजगारी, कमी कौशल्य असणार्‍याच नाही तर अधिक कौशल्य असणार्‍या लोकांच्या कामावर होणारा परिणाम या सार्‍याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.
जे इतर जगभर सुरू आहे, त्यापासून भारत दूर कसा असेल?
अलीकडेच जागतिक बॅँकेनं प्रसिद्ध केलेला एक अभ्यास म्हणतो की, दरवर्षी साधारण ऑटोमेशनमुळे सरासरी 69 टक्के नोकर्‍या भारतात गमावल्या जातील, अशी भीती आहे. हा आकडाच प्रचंड आहे. विशेषतर्‍ ऑटोमाबाइल्स, फार्मसी, आयटी आणि आयटीशी संबंधित सेवाक्षेत्र या सार्‍यांना हा ऑटोमेशनचा तडाखा सर्वात आधी बसणार आहे. आणि नव्या तंत्रज्ञानामुळे या क्षेत्रातील माणसांची गरज संपणार आहे.
म्हणजे काय तर जे काम यंत्र करू शकतात, तेच काम जर माणूस करत असेल तर यापुढे कुठलंही कंपनी व्यवस्थापन यंत्राच्या कामासाठी माणसाला रोजगार देणार नाही. परिणाम म्हणजे नोकर्‍या जाणार.
त्या नोकर्‍या जाण्यालाही एक नवीन शब्द आहे, स्किल गॅप!
यंत्राचं स्किल माणसापेक्षा सरस असेल तर माणसाला रोजगार मिळणं बंद होईल अशी भीती आहे.
त्यावर उपाय काय तर? 
हल्ली दोन उपाय चर्चेत आहेत.
1. असं काहीतरी काम माणसाला जमायला हवं जे यंत्राला करता येणार नाही.
2. यंत्रापेक्षाही माणसाचं कौशल्य सरस हवं.

म्हणजेच नव्या काळात जर रोजगार मिळवायचा असेल तर काहीतरी अधिक कौशल्य आपल्याकडे हवीत. ती नसतील तर ती कमवायला हवीत. 
त्या कौशल्यांचीच ही ओळख. आणि ती कशी शिकता येतील याची ही चर्चा.
नऊ दिवस आपण देवीची उपासना करणार, दहाव्या दिवशी दसरा.
म्हणून त्यानिमित्तानं हे 10 स्किल्स आपण डोळ्याखालून घालू.
त्यातली आपल्याला आवश्यक ती काही किंवा खरंतर सगळीच शिकण्याचा प्रय} करु.
आणखी एक, जग किती वेगानं बदलतंय पाहा, वेळेवर ऑफिसला नाही गेलं तरी नोकरी जाऊ शकते.
त्यासाठी आपली ‘लेटथेट’ सवय सोडण्याचं व्रतही हातात घेता येईल.
कसं?
वाचा, ऑक्सिजनचा हा अंक.

 

1.सिखो ना, नयी भाषा!

आपल्याला खोटं वाटेल पण जगभरात फक्त इंग्रजी बोलणार्‍या मुलांना आता त्यांचे पालक आणि शिक्षक नवीन धाक दाखवत सुटलेत. त्यांना लोक सांगताहेत की, जगात इंग्रजी भाषा बोलणारे फार कमी लोक आहेत. त्याऐवजी स्थानिक भाषा वेगळ्या आहेत. जग बदलतंय. जागतिकीकरणानं जग जवळ येतं आहे, आपल्या नव्या अर्थव्यस्थेला इतर देशांशी जमवून घ्यायचं आहे. ते करायचं तर ज्यांच्याशी व्यापार करायचा, ज्यांच्या माध्यमांची ताकद वाढतेय त्या भाषा शिका. एखादी तरी फॉरेन लॅँग्वेज शिका. नुस्तं इंग्रजीच्या भरवशावर रहाल तर तुम्ही मागे पडाल. 
ते नव्या काळात जमावं म्हणून झटपट अन्य भाषा शिकवणारे अनेक अ‍ॅप आता उपलब्ध होऊ लागलेत. एवढंच नाही तर ती भाषा बोलणारे अनेकजण त्या अ‍ॅपसाठी टय़ूटर म्हणून काम करू लागलेत.
हे ‘असं’ सारं वेगानं बदलतंय! आणि आपण अजूनही धड इंग्रजी बोलता येत नाही म्हणून अडून बसलोय. ते ‘अडणं’ संपलं की, आपल्यालाही मोठी झेप घेता येऊ शकते. त्यामुळे नव्या काळात भाषा ही आपली ताकद आहे असं मानून चला. इंग्रजी तर उत्तम शिकायलाच हवी, पण त्यासोबत अजून एखादी भाषा येणं, ही आपली ताकद वाढवणारं शस्त्र ठरेल! हे नवं स्किल आपल्या भात्यात येण्यासाठी प्रय} केले तर एक पाऊल पुढं टाकलं म्हणायचं.

2.बजाता है?

हार्डवर्क तर आता सगळेच करतील, स्मार्ट वर्क आणि स्मार्टर माणसाला नव्या काळात संधी असतील हे उघड आहे. हिंदी सिनेमातही आपण पाहतोच गिटार, व्हायोलीन वगैरे वाजवणार्‍या तरुणाकडे हिरोईन लवकर आकर्षित होते. तो रोमॅण्टिसिझम सोडा पण अलीकडेले अभ्यास असं सांगतात की जो एखादं वाद्य वाजवतो त्याचा आयक्यू 7 पॉइण्ट्सने वाढलेला असतो. त्यातून एकाग्रताही वाढते, ताण कमी होतो. जो वाजवतो, तो उत्तम ऐकायला शिकतो. हे सारं तर नव्या काळात टिम बिल्डिंगसाठी फार महत्त्वाचं ठरतं. म्हणून हल्ली अनेक सीव्हीत आपण वाद्य कोणती वाजवतो हे अनेकजण लिहितात. बरीच मोठीमोठी माणसं, त्यांच्या ग्रेट हॅबिट्समध्ये अमुक तमुक इन्स्ट्रमेण्ट रोज वाजवतो असं आवजरून सांगतात. त्यामुळे नव्या काळात संगीत, वादन या कला आपल्यासाठी मनाचं पोषण करणार्‍या तर ठरतीलच पण तीही एक ताकद मानली जाईल! त्यामुळे शिकायचंच असेल किंवा सुटलं असेल अभ्यासाच्या नादात तर काहीतरी वाजवायला शिकता आलं तर उत्तम.


3.पैशाचं तंत्र?


पैशाचं सोंग तर कुणालाच आणता येत नाही. मात्र अलीकडेच एक व्हिडीओ फार गाजला. त्याचं नाव वस्र्ट पॅरेण्ट. आपल्या आईबाबांनी आपल्याला मोठमोठय़ा ट्रिप्सला नेलं नाही, जे मागितलं ते त्याक्षणी दिलं नाही, जे इतर मुलांना मिळालं ते आपल्याला नाकारलं अशा ‘वाईट्ट’ पालकांविषयी हा चिनी तरुण मुलगा सांगतो. पण तो पुढे म्हणतो, ‘ ते सगळं केलं नाही, म्हणून मी आज यशस्वी आहे. मला पैशाचं आणि कष्टांचं मोल कळतंय. नाहीतर मीही वाहवत गेलो असतो. आपल्यापैकी अनेकांची भावना तो व्यक्त करतो. मात्र या सार्‍यात आपल्याला पैशाचं तंत्र जमतंय का, ते आपण शिकतोय का, हे काही आपण स्वतर्‍ला विचारत नाही. शाळा-कॉलेजात अकाउंटिंग शिकणारेही पैशाचे व्यवहार, बचत आणि गुंतवणूक काही शिकत नाही. मोठमोठय़ा गोष्टी नव्हेत, तर आपला रोजचा खर्च लिहिणं, आपल्या एखाद्या कामासाठी किंवा छंदासाठी पैसे साठवणं हे सहसा घडत नाही. आणि मग पैसेच नाही म्हणून आपण रडत बसतो, त्यापेक्षा पैशाचं तंत्र शिकता आलं तर? आजकाल तर अनेक ऑनलाइन अ‍ॅप्स पर्सनल फायनान्सच्या टिप्स देतात, शंभर रुपये का असेना ते नीट कसे वापरायचे हे शिकून घ्यायला हवं.

4.बोला!

फार पूर्वीपासून आपल्याकडे म्हण आहे, बोलणार्‍याचे कुळीथ विकले जातात, न बोलणार्‍याचे गहू पडून राहतात. आता तर काळ असा की कुळीथ सुपर फूड बनतंय आणि गहू नको ज्वारी खा म्हणून ग्यान वाटप व्हाट्सअ‍ॅप विद्यापीठात चालतं. त्याकाळात जर आपण म्हटलं की, आपल्याला स्टेज डेअरिंग नाही, चारचौघात बोलताच येत नाही तर मग कठीण आहे. ते शिकायलाच हवं. अतिश्रीमंत वॉरन बफेंनी आपल्या भाषणांत वारंवार सांगितलंय की, नव्या काळात तरुण मुलांना काय यायला हवं तर ते पब्लिक स्पीकिंग. हल्लीचे सगळे यशस्वी नेते पाहा, त्यांची ओजस्वी भाषणं पाहा. त्यांच्या भाषणांवर लोक जीव ओवाळून टाकतात. गर्दी करतात. त्यांच्यामागे उभे राहतात. आपण काही राजकारणात जाणार नसलो तरी नव्या काळात चारचौघांत बोलता येणं, ग्रुप चर्चा करणं, वेगवेगळी प्रेझेटेन्शन सतत करत राहणं, आपला मुद्दा मांडणं, मीटिंगमध्ये मतं मांडणं हे सारं फार महत्त्वाचं आहे. ते जमलं तर आपल्या कामाचं चीज होऊ शकतं. अगदी नोकरीच्या मुलाखतीपासून ते विविध चर्चा आणि प्रेझेटेन्शनर्पयत हे सूत्र कायम राहतं. त्यामुळे बोलायला शिका, ते कसं येईल. तर घरी सराव करून, मित्रांशी बोलून, दे धडक बेधडक डेअरिंग करून ते येईल, चुकलं तर चुकलं. हल्ली ऑनलाइन काय नाही शिकता येत, यूटय़ूबवर पाहा, बोलायचं कसं हे शिकवणारेही व्हीडीओ सापडतील!

5.कनेक्ट नाऊ!

आपण सगळेच सोशल मीडिया वापरतो. तिथं अनेकांशी ‘कनेक्ट’ होतो. मतं वाचतो, मतं मांडतो; पण त्याला नवीन काळात फारसा अर्थ नाही. आपल्याच विचारांच्या माणसांची टोळकी करायची आणि सगळे छान छान म्हणत कौतुक करत राहायचं या सोशल मीडिया नेटवर्किगचा काहीही करिअरसाठी उपयोग नाही. अमेरिकन लेखक आणि मोटिव्हेशनल स्पीकर जिम रॉन म्हणतो, ‘तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर अशा माणसांत राहा, जी तुमच्यापेक्षा स्मार्ट आहेत. यशस्वी आहेत, जिद्दी आहेत आणि हुशारही आहेत. तशी माणसं असतील तर तुम्ही पुढे जाता, त्याप्रकारचं नेटवर्किग ही आपली ताकद बनवा!’
ते आपल्याला जमायला हवं. सोशल मीडिया, तंत्रज्ञान यामुळे आपण कुणाशीही चटकन संपर्क करू शकतो, मतं मांडू शकतो, आपण अमुक वतरुळात वावरतो असा आभासही तयार करू शकतो. पण ते खरं नाही. त्यापेक्षा जमीनवरचं नेटवर्किग वाढवा. म्हणजे काय तर, आपल्याला ज्या विषयात काम करायचं, त्या विषयातल्या तज्ज्ञांना भेटा. त्यांचं मार्गदर्शन घ्या. जमल्यास त्यांच्यासोबत काम करून पाहा. आणि त्यातून आपल्याला पुढं कसं जाता येईल याचे मार्ग शोधा.

6.वाचताय काय?


हल्ली कुणी वाचतं का? असं या स्किलचं हेडिंग पाहूनच कुणालाही वाटेल. हसूच येईल. आताशा जो तो म्हणतो की, तरुण मुलं वाचत नाहीत; पण वाचन हे स्किल आहे, पुस्तकच नाही तर माणसंही वाचता आली पाहिजेत. आणि नुस्ती वाचताच आली पाहिजे असं नव्हे तर चटचट, भराभर वाचून, नोंदी ठेवून, अधिक वाचता आलं पाहिजे. भरपूर वाचता आलं पाहिजे. हे असं वाचन गरजेचं आहे आणि माझ्या तरुणपणी मी ते केलं नाही याचा मला पश्चाताप होतो असं आता बिल गेट्ससुद्धा सांगतात. ज्याला इंग्रजीत म्हणतात स्पीड रिडिंग म्हणजे भराभर वाचण्याची कला. एकतर वेळ कमी असतो, त्यात वाचायला हवं, शिकायला हवं, विषय समजून घ्यायला हवा असे विषय भरपूर आहेत. काय काय वाचणार आणि कधी वाचणार? त्यामुळे आता ऑनलाइन स्पीड रिडिंग कोर्सेस सुरू झाले आहेत. जलद वाचायचं कसं, समजून घ्यायचं कसं यासाठी हे फुकट कोर्सेस ऑनलाइन आहेत. त्याचा लाभ करून घेत नव्या काळात वाचन सुधारणा मोहीमही सुरू होईल!
वाचाल तर वाचाल हे सूत्र कधीच जुनं होणार नाही, त्यामुळे वाचन नावाचं तंत्र नव्यानं शिकलेलं बरं! कारण अजूनही गूगलवर सगळी उत्तरं मिळत नाहीतच.


6. शिका-पुसा-शिका

लर्न-अनलर्न आणि रिलर्न अशी नव्या जगाची परिभाषा आहे. जे आपण शिकलो ते कधीच जुनं झालं. जे शिकलो त्यात मारे आपण तज्ज्ञ असू पण ते नव्या काळात जर कालबाह्य होणार असेल तर ते शिकलेलं पुसता आलं पाहिजे आणि नव्या गोष्टी चटचट शिकता आलं पाहिजे. हे शिकणं अवघड नाही पण ते आपल्याला शिकूच न देणारी एक गोष्ट असते, ती म्हणजे आपला अ‍ॅटिटय़ूड. सतत प्रश्न असतो की, मीच का पुन्हा पुन्हा शिकायचं. मीच का नव्यानं पुन्हा सिद्ध करायचं. तर त्याचं उत्तर एकच, बदलतं क्रिकेट. क्रिकेटमध्ये कसं आधी फक्त कसोटी सामने होते, मग वन डे आलं, गेम तोच पण फॉरमॅट आणि वेग बदलला. मग टी-ट्वेण्टी आलं. वेग वाढला आणि थरारही, ताकद आणि स्टॅमिनाही. आता हण्ड्रेड बॉल फॉरमॅट येऊ घातलाय, त्याचं तंत्र अजून वेगळं असेल. क्रिकेटचं मूळ सूत्र आणि पॅशन तेच; पण फॉरमॅट बदलतो. आपण फॉरमॅटप्रमाणं गेम बदलला नाही तर आपण टिकणार कसे नव्या पीचवर. त्यासाठी आपला आदर्शच हवा विराट कोहली. त्याच्याप्रमाणे सर्व फॉरमॅट उत्तम साधणं आपल्याला जमलं पाहिजे. ते जमायचं म्हणून हे लर्न-अनलर्नचं नवीन तंत्र शिकायला हवं. ते कसं करायचं, हातात मोबाइल आहे, सहज सापडेल गूगलवर याविषयीचं सगळं ज्ञान!

8.स्वयंपाक करा मस्त! 

नवीन काळ, नवीन करिअर आपण नव्या स्किलची चर्चा करतोय आणि यात काय हे भलतंच? जुनाट? स्वयंपाक काय शिकायचा? मुलांनीच कशाला आता मुलीही शिकत नाही स्वयंपाक असं सगळं आलंच असेल मनात तर ते होल्ड करा. आणि हाच गैरसमज बाजूला काढून टाकण्याचा प्रय} करा. स्वयंपाक करता येणं हे एक लाइफ स्किल आहे. आपण जगाच्या पाठीवर कुठंही असलो आणि कितीही यशस्वी झालो तरी दोन वेळेला किमान जेवावं लागतंच. त्यासाठी पैसे देऊन बाहेरून अन्न मागवता येतो, स्वयंपाकाला मदतनीस ठेवता येतो हे खरंच. पण तरीही स्वयंपाक येणं हे एक नवीन महत्त्वाचं स्किल आहे. त्याचं कारण असं की, स्वयंपाक करता येणं ही कला आहेच. मात्र माणसं जोडण्याची, त्यांच्या संस्कृतीशी जोडून घेण्याचाही तो एक सोपा आणि प्रेमळ रस्ता आहे. आपण नीट जेवलो, तब्येत उत्तम असली तर करिअर करता येतं, नाहीतर रोज हॉटेलचं खाऊन तब्येतीशी खेळ होतो. त्याहून महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाक करताना मन एकाग्र होऊ शकतं, रंगगंधाची ही कला स्ट्रेसबस्टर म्हणून आता जगभर स्वीकारली जाते आहे. त्यामुळे एक नवीन स्किल म्हणून स्वयंपाक शिका, ही कला तुम्हाला कधी सोडत नाही आणि उपाशीही ठेवत नाही.

9. प्रश्न विचारण्याचं तंत्र

त्यात काय असं वाटतं या स्किलचं नाव वाचून! पण ते तसं नाही. आपण ज्या काळात राहतो, तिथं माहितीचा धबधबा वाहतो. आपल्या मोबाइलवर भरपूर माहिती आहे. मात्र त्या माहितीलाच नाही तर आवतीभोवतीच्या परिस्थितीला आणि माणसांनाही प्रसंगी का असं विचारण्याचं तंत्र शिकून घ्यायला हवं. त्यासाठी फार मोठं धाडस नाही लागत, लागते ती फक्त चौकस नजर आणि वृत्ती. तो का विचारला तर आपल्याला खरी उत्तरं मिळू शकतात, परिस्थितीचं आकलन होऊ शकतं आणि मिळालेली माहिती कशी वापरायची हे कळू शकतं. माहिती ही नव्या काळाची ताकद आहे, ती मिळतेच. पण त्या माहितीचं विेषण करता आलं नाही, त्यातलं खरं-खोटं ताडून पाहता आलं नाही तर मग आपल्याला नेमका मार्ग सापडत नाही. त्यामुळे न बिचकता का असं विचाण्याचं, उत्तरं शोधण्याचं तंत्र शिकायला हवं. या ‘का’ची आपल्याला गरज आहे, हे अजिबात विसरायचं नाही.

10. जाऊद्याना!


स्ट्रेस, मेण्टल स्ट्रेस, अपमान, नात्यातले घोळ, प्रेमभंग, नोकरीतलं राजकारण, पाय ओढणारे लोक, तुला जमणारच नाही म्हणणार्‍या वृत्ती, आवतीभोवतीच्या चमकोंचा चमचमाट हे सारं काय करतं? आपल्या मनावर ओझं होऊन बसतं. तुम्हाला ती लिंबाची गोष्ट माहिती आहे ना. एका हातात लिंबू घ्या असं शिष्यांना एका गुरुजींनी सांगितलं. लिंबाचं ते काय वजन. हातात घेतला लिंबू. आता ठरलं की, तो लिंबू चोवीस तासात कधीच हातातून खाली ठेवायचा नाही. तो सांभाळायचा. हरवायचा नाही. थोडा वेळ काही वाटलं नाही, पण नंतर तो इटुकला लिंबूच ओझं झाला. त्यानं हात बांधून टाकले. काहीच करता येईना. वजनानं किरकोळ पण ओझं मोठं असं झालं त्या लिंबाचं. आपल्या अपमानांचं आणि वेदनांचंही तसंच असतं. ते असतात छोटे, असतात हे मान्य, पण तरी ते सतत बाळगल्यानं ते आपले हात बांधून टाकतात. पायात बेडय़ा घालतात. आणि त्या बेडय़ांचा परिणाम असा होतो की आपलीच प्रगती होत नाही. आपण तिथंच सडत राहतो, मनातल्या मनात.
म्हणून तो लिंबू खाली ठेवा! अपमान आणि वेदना, सोडून द्यायला शिका. विसरण्याची कला जमत नाही पण निदान मागे टाकण्याचं तंत्र तरी शिकून घ्यायला हवं.
त्यासाठी व्यायाम, प्राणायाम आणि सतत नवीन काहीतरी शिकण्याची, नवीन यश मिळवण्याची जिद्द आपल्या उपयोगी पडू शकते. हे ‘लेट गो’ करण्याचं, जाऊंद्या म्हणून सोडून सोडून देण्याचं स्किल आपल्या वयासोबत वाढलं पाहिजे, तर आपण जिंकू, कुठलीही लढाई!

Web Title: This Navratri try to learn 10 new life skills, it will lead you to success.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.