लेडी बाउन्सर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 10:54 AM2018-05-31T10:54:35+5:302018-05-31T10:54:35+5:30

नाइट लाइफ, नवं इव्हेण्ट कल्चर लग्नांचेही मोठे होत जाणारे सोहळे राजकीय सभा ते कॉलेजचे बडे इव्हेण्ट या साऱ्या ठिंकाणी आता ‘बाउन्सर’ असतात.

Lady Bouncer | लेडी बाउन्सर

लेडी बाउन्सर

नाइट लाइफ, नवं इव्हेण्ट कल्चर लग्नांचेही मोठे होत जाणारे सोहळे राजकीय सभा ते कॉलेजचे बडे इव्हेण्ट या साऱ्या ठिंकाणी आता ‘बाउन्सर’ असतात. बाउन्सर म्हणजे इव्हेण्ट सुरळीत चालावा म्हणून काळजी घेणारे एकप्रकारचे खासगी सुरक्षारक्षक. इतके दिवस हे बाउन्सर फक्त पुरुषच असायचे. तगडे, धिप्पाड आणि कोरड्या नजरेचे. आता बदलत्या सेवाक्षेत्रात मुलीही बाउन्सर म्हणून काम करू लागल्या आहेत. मुंबई-दिल्लीत तर नाइट लाइफच्या जगात तरुण मुली बाउन्सर म्हणून मोठ्या प्रमाणात दिसतात. पुरुष बाउन्सरपेक्षा जास्त पैसे कमावतात. आता पुण्यातही महिला बाउन्सर्स काम करत आहेत. पुण्यातल्या एका वस्तीतल्या मुली बाउन्सर म्हणून नवीन करिअर घडवत आहेत..या नव्या संधी स्वीकारणा-या
बाउन्सर मुलींशी गप्पा...


सेवाक्षेत्रात महिला बाउन्सरची चलती

बाउन्सर हा व्यवसाय केवळ पुरु षांनी करायचा असा आहे, या समजाला छेद दिला तो Delia El-Hosayny  या ब्रिटिश नागरिक असलेल्या महिलेनं. दणकट आणि कमावलेली शरीरयष्टी असलेल्या डेलियाने १९८५ मध्ये ब्रिटनमधील एका पबमध्ये बाउन्सरची नोकरी स्वीकारली. स्त्री-पुरु ष समानतेच्या अनेक यशोगाथा पाहिलेल्या ब्रिटिश समाजात त्यावेळी डेलियाची नोकरी ही वर्तमानपत्राची पहिल्या पानाची बातमी होती. या नोकरीत तिनं मारामाऱ्या पाहिल्या, त्या थांबविण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर वाद सोडविताना तिनं चक्क गोळ्याही झेलल्या. गरोदर अवस्थेतही कामावर असलेल्या डेलियाने अशाच एका गुद्देबाजीनंतर त्या पबच्याच टॉयलेटमध्ये मुलाला जन्म दिला. ३० वर्षांच्या बाउन्सरच्या नोकरीनंतर ती आता निवृत्ती जीवन जगत आहे. डेलियामुळे या क्षेत्रात एकामागोमाग एक महिला येत गेल्या. डेलियाला बघण्यासाठी एकेकाळी लोक ब्रिटनच्या पबमध्ये जात असत.
महिलांचे सक्षमीकरण, पुरु षांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहणे, अर्धी शक्ती-ताकद वगेरै घासून गुळगुळीत झालेल्या शब्दांतून व्यावसायिक जगात पाय रोवून उभ्या ठाकलेल्या महिलांच्या यशोगाथा भारतीय मीडियासाठी टीआरपीची एक हक्काची बाब आहे. पण जग कितीही पुढे चालले तरी या अर्ध्या शक्तीची शक्ती ही तशी कथित समाजाने निश्चित केलेल्या व्हाईट कॉलर नावाच्या व्यवसायात खर्ची पडताना दिसते.
मात्र उल्लेखनीय गोष्ट म्हणजे सरत्या आठ वर्षांत देशातील विविध बार, नाइट क्लब्स, पब्समध्ये आजवर सुमारे साडेसात हजारांपेक्षा जास्त महिलांनी बाउन्सरची नोकरी स्वाकारली आहे. त्यातही विशेष उल्लेखाची बाब म्हणजे, या क्षेत्रात पुरुषांपेक्षा महिला बाउन्सर्सना मोठी मागणी आहे. साधारणपणे महिला बाउन्सर असलेल्या ठिकाणी लोक जरा विशिष्ट काळजी घेतात, सभ्यतेचा मुखवटा अधिकच काळजीपूर्वक ओढतात, तिथे वाद-विवादही कमी झडतात, असे बार, पब, क्लब मालकांचे अनुभवाचे बोल आहेत आणि अशा ठिकाणी येणाºया लोकांसोबत येणाºया महिला ग्राहकांचंही प्रमाण लक्षणीय असल्याचं हे मालक सांगतात. महिला बाउन्सरला असलेली वाढती मागणी ही त्यांच्या उत्पन्नातूनही प्रतिबिंबित होते. उपलब्ध माहितीनुसार, पुरु ष बाउन्सर्सना जिथे एका शिफ्टचे ८०० ते एक हजार रुपये आणि भत्ता मिळतो त्या तुलनेत महिला बाउन्सर्सना तेवढ्याच आठ तासाच्या ड्यूटीचे १५०० ते २००० रुपये अधिक भत्ता असा पगार मिळतो. मनुष्यबळ क्षेत्रात कार्यरत कंपन्यांच्या मते, जसजसा हॉटेल व्यवसायाचा विकास होईल, तसतशी महिला बाउन्सर्सची मागणीदेखील वाढताना दिसेल. आगामी पाच वर्षांत महिला बाउन्सर्सचे प्रमाण हे आताच्या संख्येच्या तुलनेत किमान चौपट किंवा त्याहीपेक्षा अधिक झालेले दिसेल.


(संदर्भ : मनोज गडणीस यांची फेसबुक पोस्ट)

Web Title: Lady Bouncer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.