सिंगल है तो क्या गम है?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 04:35 PM2018-11-15T16:35:11+5:302018-11-15T16:35:32+5:30

सिंगल असणं म्हणजे काही गुन्हा नव्हे. आजकाल तर कुणीही विचारतं, अजून सिंगल आहेस? नशीब आता बाजारपेठेनं तरी सिंगलपण साजरं करायला घेतलंय!

being single? unhappy? better celebrate it! | सिंगल है तो क्या गम है?

सिंगल है तो क्या गम है?

Next
ठळक मुद्देनुकत्याच साजर्‍या झालेल्या सिंगल्स डेच्या निमित्तानं हा सिंगलदिल हाल!

- पवन जोशी

चिन्मय अरे, अजून तू सिंगल कसा काय? - ऑफिस कलीग भार्गवीनं विचारलंच.
‘अगं सानिया तू कशी काय अजून  रिलेशनमध्ये नाहीस. तुला सिंगलच राहायला आवडतं का?’ कॉलेजमध्ये मित्र असलेला  विकास विचारतो.
हे असे संवाद नेहमी आपल्या कानावर येतात. तेव्हा आपण सर्वापेक्षा वेगळे आहोत की सामन्याच आहोत हे काही कळत नाही. तू अजून सिंगल कसा/कशी हा प्रश्न चिन्मय किंवा सानिकाला विचार करायला लावणारा असतो. बुचकळ्यात पाडतो की, सगळ्यांचं जमलं. आपलं काय बिनसलं आहे. त्यात तुम्ही फक्त ‘सिंगल’ आहात म्हणून इतर लोकांच्या म्हणजे अगदी तरुण दोस्तांच्या नजरा  ‘बिचारा/बिचारी’ या दृष्टीनं पाहतात. जसं काही सिंगल असणं म्हणजे गुन्हा आहे?
हे ‘सिंगल’ असणं इतकं का वाईट असतं?
प्रेम व्यक्त करण्याचे व्हॅलेण्टाइन्स डे, चॉकलेट डे, रोझ डे हे दिवस असतात. ते जोडपी सेलिब्रेट करतात. त्यावेळी सिंगल बिचारे बाजूला होतात. म्हणून हा नवीन दिवस, सिंगल डे जरा हायसं करतो. बरेच जण सिंगल असतात जगात हे तरी त्यातून कळतं.  आपला ‘सिंगल’पणा अभिमानाने साजरा करण्यासाठीचा दिवस म्हणजे सिंगल डे. 11 नोव्हेंबर म्हणजे हा सिंगल डे, त्याला अ‍ॅण्टीव्हॅलेण्टाइन्स डे असंसुद्धा म्हणतात. चीनमध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा केला. या दिवशी सिंगल असणारे सगळे स्त्री-पुरुष एकत्र भेटतात. मोठमोठय़ा हॉटेल्समध्ये मेजवान्या करतात. एकमेकांना भेटवस्तू देतात आणि ह्या दिवसाचा आनंद साजरा करतात. अगदी ऑनलाइन वस्तूंची विक्री करणार्‍या कंपन्यांचा कोटय़वधीचा खप या दिवशी होतो.
11 तारीख आणि नोव्हेंबर हा अकरावा महिना म्हणजे चार वेळा 11.11 तारीख, दोन किंवा त्यापेक्षा अधिक जणं म्हणजे ग्रुप. असे चार जण जे सिंगल आहेत त्यांच्या सर्वाचा ग्रुप म्हणजे 11.11.
तिकडं चीनमध्येच कशाला, आपल्याकडेही सिंगल्यांना बरंच वाटावं असा हा दिवस आहे. हल्ली कॉलेजमध्ये तर गलफ्रेण्ड/ बॉयफ्रेण्ड असणं जणू काही सक्तीचंच व्हायला लागलं आहे. ट्रेण्ड आहे, रिलेशनमध्ये असण्याचा ! रिलेशनमध्ये नसणं ही काही अबनॉर्मल गोष्ट आहे का हा प्रश्न सिंगल असणार्‍यांना नेहमीच वाटतो. पण रिलेशनमध्ये असणारे काहीजण त्रस्त होऊन सांगतात, बाबा नको ती झंझट. स्वतर्‍चा असा कोणताच वेळ  मिळत नाही. कारण पार्टनरबरोबर होणारे छोटय़ा छोटय़ा गोष्टींवरून वाद. इथे नको तिथे नको, ही चॉइस ती चॉइस, त्यात सोशल मीडिया या गोष्टी रोजच्याच असतात. या सगळ्यांचा कंटाळा येतो. स्वतंत्रपणे हवं तसं जगता येत नाही. स्वतर्‍ला हवी असणारी स्पेस कधी मिळत नाही. बरं आहे त्यापेक्षा सिंगल असणं. काही कटकट नाही.
अर्थात सिंगल म्हणजे एकाकी नव्हे. बोअरिंग नव्हे. जगण्यात काहीच अर्थ नाही असंही नव्हे. उदास जगणं नव्हे.  कोणी ‘सिंगल बाय चॉइस’ असतो तर कुणाला खरंच आपलं प्रेम मिळत नाही. कुणी अंतमरुख असतो, कुणाला फक्त इंतजार असतो. 
पण मग प्रश्न येतो सिंगल असणार्‍यांनी एन्जॉय कसं करायचं. त्यालाच तर आता बाजारपेठ असे डेचे निमित्त पुरवते आहे. वेगवेगळ्या ठिकाणी भटकायला जाणं, त्या ठिकाणी हवं तितकं थांबणं. विविध ठिकाणच्या खाद्य संस्कृतीचा आनंद घेणं, जवळच्या मित्रांसह मनमुराद गप्पागोष्टी करत बसणं, आवडते नाटक/सिनेमे बघणं, सामाजिक कार्यात सहभागी होणं, वेगवेगळ्या कलांमध्ये रमणं, अशा गोष्टी करण्यात सिंगल मंडळी आपला आनंद शोधतात. या सगळ्यांसाठी कोणाच्या बंधनाची गरज नसते.
एका वाक्यात जर सांगायचे असेल तर मुक्त आणि बिनधास्त जगण्याची तयारी ‘मंझील’च त्यांना सापडली असते. ती त्यांना फक्त वेगवेगळ्या मार्गानी गाठायची असते. म्हणून सिंगल असणं हे काही कोणते वेगळेपण नसून स्वच्छंदी मनाने जगण्याची अलग दुनिया आहे.
हेमंत कुमारचं ‘सोलवाँ साल’ या सिनेमातलं गाणं बराच अर्थ सांगून जातं.
है अपना दिल तो आवारा,
न जाने किस पे आयेगा.


 

Web Title: being single? unhappy? better celebrate it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.