2019: या वर्षी चर्चेत राहतील अशा करिअरच्या 9 नव्या वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 06:00 AM2019-01-03T06:00:00+5:302019-01-03T06:00:02+5:30

आपल्याला आज जे जमतं त्याचा दोन वर्षानी कुणाला काहीही उपयोग नाही! त्याविषयी दुःख करत राहाल तर कुणीही तुमच्यासाठी रखडणार नाही!

2019: 9 new hot Jobs, try this! | 2019: या वर्षी चर्चेत राहतील अशा करिअरच्या 9 नव्या वाटा

2019: या वर्षी चर्चेत राहतील अशा करिअरच्या 9 नव्या वाटा

Next
ठळक मुद्देनव्या ९ वाटांचा शोध घेणारा ऑक्सिजनचा विशेष अंक नैराश्य बाजूला सारून, नवी कौशल्य शिकून या लाटेवर स्वार होत करिअर घडवावं लागेल.AI, सायबर सिक्युरिटी, बिग डाटा, IOT, रोबोटिक ऑटोमेशन, सोशल मीडिया, क्लाउड कम्प्युटिंग, थ्रीडी पिंट्रिंग, व्हीआर


अतुल कहाते

अमुकअमुक  आयटी  कंपनीनं  हजारो कर्मचार्‍यांना कामावरून  काढून टाकलं.
**
 एका  आयटी  कंपनीनं  यावर्षी  कर्मचारी भरतीत अमुक टक्के कपात जाहीर केली.
**
एका आयटी कंपनीतल्या  कर्मचार्‍यांचा कामगार संघटना उभी करण्याचा निर्णय.
** 
अलीकडच्या काळातल्या या बातम्या. या अर्थाच्या बातम्या आता वारंवार प्रसिद्ध होतात. त्यांचे मथळे घाबरवून सोडतात. इंजिनिअरिंगची पदवी  घेऊनसुद्धा  नोकरी  मिळत  नसल्यानं सैरभैर  झालेल्या  युवक-युवतींच्या  कहाण्या,  आयटीमध्ये  काम  करत  असलेल्या  किंवा  त्यात  काम  मिळू  शकत  नसलेल्या  लोकांच्या  मानसिक  आणि शारीरिक  समस्या,  घरोघरी  उद्भवणार्‍या  नातेसंबंधांमधल्या  अडचणी  हा  सगळा प्रकार म्हणजे आता आयटीला  लागलेली  घरघर  आहे, असं बोललं  जातं. केवळ युवा वर्गातल्या  लोकांसमोरच या संदर्भातल्या  समस्या  आहेत असं नाही; चाळिशीकडे  झुकणार्‍या आयटीत कार्यरत असलेल्या अनेकांची अक्षरशर्‍ झोप  उडालेली आहे. आपली नोकरी  कधी  जाईल याची त्यांना शाश्वती नाही. सातत्यानं वाढत चाललेला दबाव, नव्या तंत्रज्ञानाचा मारा आणि आपल्याला यातलं काही येत  नसल्याची आतून खात असलेली  भावना, सुरुवातीचे पगार आणि  त्यानुसार बांधलेले अंदाज यांच्या  डोलार्‍यावर उभं केलेलं खर्चीक  आयुष्य,  वाढत्या  वयातल्या  मुलांची  शिक्षणं,  घराचे  हप्ते  हे  सगळं कसं  सावरायचं या भीतीनं अनेकांच्या पोटात गोळा आलेला आहे.
खरं म्हणजे हा काळाचा नियमच आहे. लहानपणी भाकरी फिरवली  नाही की करपते ही म्हण  आपल्यापैकी बहुतेक जणांनी  पाठ  केलेली असते. या म्हणीचा आणि आपल्या आयुष्याचा खरोखर काही संबंध आहे हे आपल्याला तेव्हा  माहीत नसतं. मात्र आता केवळ  आयटीलाच नव्हे तर जवळपास  सगळ्याच क्षेत्रांना आता ही म्हण लागू पडते आहे. 
 आपलं मन बदल स्वीकारत नाही किंवा ते स्वीकारूनसुद्धा त्यावर  अंमलबजावणी करण्याचं मानसिक  आणि शारीरिक चापल्य आपल्यात  नसतं म्हणून हा प्रश्न निर्माण होतो.  आपल्यापैकी बहुतेक जणांनी आपले  आजी-आजोबा, आई-वडील  तसंच  इतर नातलग यांनी  आयुष्यभर  एकाच  प्रकारचं काम केलं असल्याचं अनुभवलेलं  असल्यामुळे  आपण  स्थैर्य  आणि   कुठेही  न  वळणारा  नाकासमोरचा  सरळ  रस्ता  याच  गोष्टी  आपल्या  आयुष्यात  गृहीत  धरलेल्या  असतात.  
आजचं जग  मात्र  कालच्या जगापेक्षा फार  वेगळं  आहे!
1991 साली  आपण  नाइलाजानं का होईना; पण  जागतिकीकरण  आणि  आर्थिक  उदारीकरण  या  गोष्टी  स्वीकारल्या. खरं तर तेव्हाच  आपल्या  कामाविषयीच्या  पारंपरिक  कल्पना  बदलणं  गरजेचं  होतं.  मात्र तसं झालं नाही. या नव्या काळात आता  आपली  तुलना  आणि  स्पर्धा  काही  अंशी  जागतिक  स्तरावर  होते  हे  जो ओळखतो, तो नव्या परिस्थितीशी कसं  लढायचं  याची  तयारी  आधीपासूनच  करून  ठेवतो.  सातत्यानं  होत  असलेल्या  बदलांचा  सामना  करण्यासाठी  स्वतर्‍ला  तयार  ठेवतो. बिनकामाच्या  स्वप्नरंजनामध्ये   गुंगून  जात  नाही.  तसंच  आधी  घडून  गेलेल्या  सुखद  गोष्टी  किती  चांगल्या  होत्या असं  म्हणून  तो  उसासे  सोडत  बसत  नाही. होतं असं की हे सगळ्यानांच जमत नाही. फार कमी लोकांना जमतं. ज्यांना जमतं त्यांचं करिअर घडतं आणि त्यांना बदल हाताळणंही सोपं जातं.
  आयटीच्या  संदर्भात  बोलायचं  तर, बदलायला तयार असणारा जावा  आणि डॉट नेट यांचा अभ्यास  करतानाच  स्वतर्‍ला सांगतो की,  उद्याचं  जग  पीएचपी  आणि  हडूप  यांचं असेल. आपल्याला  आज  जे  जमतं  त्याचा  दोन  वर्षानी  कुणाला काहीही  उपयोग नाही  हे  कटू सत्य  तो  स्वतर्‍ला  सांगत  राहातो.  जे बदलतंय त्याविषयी दुर्‍ख करत बसण्यापेक्षा प्राप्त  परिस्थितीत  आपल्याला  काय  करणं  शक्य  आहे  याचा विचार महत्त्वाचा ठरतो.  
म्हणजे पाहा, आपला  स्मार्टफोन आपल्याला अपडेटेड लागतो, दर  वर्षाकाठी तो बदलावा असं वाटतं. पण आपलं काम वर्षानुवर्षे तेच राहील, ते बदलू नये असं म्हटलं तर कसं चालेल? ते बदलणारच!
बदलणारं हे जग  जसं आपल्याला  अनुभवायचं  आहे तसाच त्याचा फायदाही करून  घ्यायचा  आहे.  या  बदलांचा  फटका  आपल्याला बसला असं  म्हणण्यापेक्षा  त्या बदलांवरच आपण स्वार होऊ शकू का, असा विचार करायला हवा. 
बदलांशी जुळवून घेत जो असा नवा विचार  करेल  तोच या बदलांच्या लाटेत तरेल! नैराश्य बाजूला सारून, नवी कौशल्य शिकून या लाटेवर स्वार होत करिअर घडवावं लागेल.
ती कौशल्यं कुठली, नवीन संधी कुठल्या हेच सांगणारा हा खास अंक. या  नव्या  ९ वाटांचा  शोध  घेणारा  ऑक्सिजनचा  विशेष  अंक 

AI, सायबर सिक्युरिटी, बिग डाटा, IOT, रोबोटिक ऑटोमेशन, सोशल मीडिया, क्लाउड कम्प्युटिंग, थ्रीडी पिंट्रिंग, व्हीआर

*****
 

हे आपल्याच नशिबी का? 

आज आयटीत असलेल्या अनेक तरुणांना प्रश्न पडतो, हे आपल्याच नशिबी  का? 
याचं सोपं उत्तर म्हणजे 1990च्या काळात जगावर राज्य करणारी मायक्रोसॉफ्ट  कंपनी 2000च्या  दशकात  गूगलनं  जवळपास  कालबाह्य  करून  टाकली. सत्या  नाडेलांना विलक्षण प्रयत्न करून मायक्रोसॉफ्टला पुन्हा काळाशी सुसंगत  करण्यासाठी धडपडावं लागतं आहे. ज्या गूगलनं अक्षरशर्‍ एका दशकाच्या काळात  आपला विलक्षण पगडा जगावर बसवला ते गूगल अजून 50 वर्षानी अ‍ॅमेझॉन  तसंच फेसबुक यांच्या सकट कालबाह्य होईल अशी भाकितं काही भविष्यवेत्ते  आत्ताच  वर्तवित आहेत!  जिथं या  मातब्बर कंपन्या कालबाह्य होतील अशी चर्चा आहे तिथं माणसांच्या, कामाच्या कालबाह्यतेविषयी काय बोलणार?  
काही वर्षानी यंत्रमानव इतका शक्तिशाली आणि हुशार होईल की तो कदाचित  माणसालाच संपवेल असं स्टीफन हॉकिंगही म्हणून गेलेत. एकविसाव्या शतकाच्या  मध्यावर आपण पुणे-मुंबई प्रवास केल्यासारखं मंगळावर जाऊ शकू असं एलॉन  मस्कसकट अनेकजण छातीठोकपणे सांगत आहेत. चालकविरहित गाडय़ा, अनेक  रोगांवर मात, कधीच न संपणारी ऊर्जा, घरात झाडझूड करण्यापासून इतर अन्य घरगुती कामं यंत्रमानव करतील. करमणुकीच्या आज अशक्यप्राय वाटणार्‍या गोष्टी तयार होतील अशी चर्चा आहे. 
तंत्रज्ञानानं जग इतकं वेगानं बदलत जाईल अशी चर्चा असताना आपण, आपली कामं बदलणारच नाहीत, हे कसं शक्य आहे? पुन्हा हे बदल काही धिम्या गतीनं होत नाहीत, तर त्यांचा वेग प्रचंड आहे. म्हणता म्हणता एखादा लांबचा बदल आपल्या आयुष्यात स्थिरावताना दिसतो. जे पूर्वी घडायला कदाचित एखादं दशक  लागत असेल ते आता वर्षभरात घडतं आहे आणि इथून पुढे ते काही महिन्यांमध्ये  घडेल. 20 वर्षापूर्वी कुणाशी संपर्क साधायचा तर तो माणूस फोनवर भेटेल की नाही, फोन लागेल की नाही याची शाश्वती नसायची. आज संपर्काची अनेक जलद साधनं आहेत आणि काही सेकंदात होणारा संपर्कही आहे. पदोपदी जाणवणारे असे बदल जर तंत्रज्ञान घडवत असेल तर त्याच्या वेगानं आपल्याला बदलावंच लागेल.
दुसरा पर्यायच नाही!

 

Web Title: 2019: 9 new hot Jobs, try this!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.