जागतिक अ‍ॅथलेटिक्स : भारताची आशा नीरज चोप्रावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 01:38 AM2017-08-10T01:38:27+5:302017-08-10T01:38:40+5:30

येथे सुरु असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत आतापर्यंत भारतीयांची निराशाजनक कामगिरी झालेली असताना गुरुवारी स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.

World Athletics: India's Hope Neeraj Chopra | जागतिक अ‍ॅथलेटिक्स : भारताची आशा नीरज चोप्रावर

जागतिक अ‍ॅथलेटिक्स : भारताची आशा नीरज चोप्रावर

Next

लंडन : येथे सुरु असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत आतापर्यंत भारतीयांची निराशाजनक कामगिरी झालेली असताना गुरुवारी स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. यंदाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताला नीरजकडून पदकाच्या सर्वाधिक आशा आहेत.
दरम्यान, १९ वर्षीय नीरजने ज्यूनिअर स्तरावर जागतिक विक्रम रचला असून तो पात्रता फेरीतून आपली दावेदारी सिध्द करेल. तरी, स्पर्धेतील अनेक नामवंत खेळाडू पाहता नीरजकडून पदक जिंकण्याची शक्यता कमी बाळगली जात आहे. त्याचवेळी, यावेळी नीरजसह देविंदर सिंग कांगदेखील भारताला पदक मिळवून देण्यास प्रयत्न करेल. तरी, एकूण कामगिरी पाहता भारताला नीरजकडून अधिक अपेक्षा आहेत. यंदाच्या मोसमात नीरजची सर्वोत्तम कामगिरी ८५.६३ मीटर अशी आहे आणि आयएएएफच्या रँकिंगमध्ये तो १४व्या स्थानी विराजमान आहे. नीरजची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ८६.४८ मीटरची असून गेल्यावर्षी ज्यूनिअर विश्वविक्रम रचताना त्याने ही कामगिरी केली. मात्र, दखल घेण्याची बाब म्हणजे, पदक निश्चित करण्यासाठी नीरजला आपल्या या सर्वोत्तम कामगिरीमध्ये किमान एक मीटरहून अधिक सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. (वृत्तसंस्था)
 

Web Title: World Athletics: India's Hope Neeraj Chopra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.