महिला टी-२० विश्वचषक; भारताचा बांगलादेशवर ७२ धावांनी विजय

By admin | Published: March 15, 2016 06:23 PM2016-03-15T18:23:15+5:302016-03-15T18:23:15+5:30

फलंदाजाच्या जोरदार कामगीरीनंतर गोलंदाजानी केलेल्या अचूक माऱ्याच्या बळावर भारतीय महिला संघाने बांगलादेशचा ७२ धावांनी पराभव केला.

Women's T20 World Cup; India beat Bangladesh by 72 runs | महिला टी-२० विश्वचषक; भारताचा बांगलादेशवर ७२ धावांनी विजय

महिला टी-२० विश्वचषक; भारताचा बांगलादेशवर ७२ धावांनी विजय

Next
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. १५  - फलंदाजाच्या जोरदार कामगीरीनंतर गोलंदाजानी केलेल्या अचूक माऱ्याच्या बळावर भारतीय 
महिला संघाने बांगलादेशचा ७२ धावांनी पराभव केला. मिताली राज(४२), वेलास्वामी वनिता(३८), हरमनप्रीत कौर(३९) व वेदा कृष्णस्वामी(३६) यांच्या दमदार खेळाच्या बळावर भारताने निर्धारीत २० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात १६३ धावा करत बांगलादेशसमोर विजयासाठी १६४ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताच्या १६४ धावांच्या बलाढ्य लक्षाचा पाठलाग करताना बांगलादेश संघाला २० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात ९१ धावांपर्यंतच मजल माराता आली. भारताकडून सर्वच गोलंदाजानी आपली कामगीरी सुरेख बजावली. पाटील आणि यादव यांनी प्रत्येकी २ बांगालादेशी फलंदाजाला बाद केले.
त्यापुर्वी, बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकून भारताला प्रथम फलंदाजीस आंमत्रित केले होते. कर्णधार मिताली राज आणि वेलास्वामी वनिताने ६२ धावांची धडाकेबाज दिली. या सलामीच्या जोडीने पहिल्या ६.३ षटकात १० च्या धावगतीने ६३ धावांची धडाकेबाज सलामी दिली. कर्णधार मिताली राजने ३५ चेंडून ५ चौकाराच्या मदतीने संयमी ४२ धावांची खेळी केली तर वेलास्वामी वनिताने २४ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने झटपट ३८ धावांची खेळी केली. 
 
भारत मजबूत स्थितीत असतानाच भारताला सलग दोन झटके बसले वेलास्वामी वनितानंतर मंदना खातेही न उघडता बाद झाल्याने भारताची धावगती मंदावली. अनुभवी मिताली राजने कौर सोबत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. हरमनप्रीत कौरने आक्रमक फंलदाजी करताना २९ चेंडूत ३ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने झटपट ३९ धावा केल्या. शेवटच्या हाणामारीच्या षटकात वेदा कृष्णस्वामीने २४ चेंडूत २ षटकाराच्या मदतीने ३६ धावा केल्या. बांगलादेश तर्फे रुमाना अहमद आणि फाहिमा खातूनने भारताच्या दोन फलंदानां बाद केले. तर नाहिदा अख्तरने एका भारतीय फलंदाजाला तंबूचा रास्ता दाखवला. 

Web Title: Women's T20 World Cup; India beat Bangladesh by 72 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.