विश्वनाथन आनंदने ताल स्मृती रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा जिंकली!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 06:49 PM2018-03-05T18:49:21+5:302018-03-05T18:49:21+5:30

मॉस्को येथे सुरु असलेली ताल स्मृती रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २०१८ भारताचा माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने जिंकली. रियाध येथे नुकतीच संपन्न झालेली वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ आनंदने जिंकली होती. ताल स्मृती रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २०१८ जिंकत त्याने अद्याप अजून त्याच्यात बुद्धिबळ खेळण्याची जिद्द आणि स्पर्धा जिंकण्याची क्षमता कायम असल्याची ग्वाही पुन्हा एकदा दिली आहे. 

Vishwanathan Anandne Talent Rapid Chess Championship! | विश्वनाथन आनंदने ताल स्मृती रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा जिंकली!

विश्वनाथन आनंदने ताल स्मृती रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा जिंकली!

googlenewsNext

- केदार लेले 

लंडन : मॉस्को येथे सुरु असलेली ताल स्मृती रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २०१८ भारताचा माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंदने जिंकली. रियाध येथे नुकतीच संपन्न झालेली वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ आनंदने जिंकली होती. ताल स्मृती रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा २०१८ जिंकत त्याने अद्याप अजून त्याच्यात बुद्धिबळ खेळण्याची जिद्द आणि स्पर्धा जिंकण्याची क्षमता कायम असल्याची ग्वाही पुन्हा एकदा दिली आहे. 

आनंदची विजयी वाटचाल !
ताल स्मृती रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत चार विजय, एक हार आणि चार बरोबरी अशा उत्कृष्ट कामगिरीमुळे सहा गुणांसह विश्वनाथन आनंदने ही स्पर्धा आपल्या निकटतम प्रतिस्पर्ध्यांपेक्षा एक गुणांच्या आघाडीने मोठ्या दिमाखात जिंकली!

आनंदची आक्रमक सुरुवात!
अनुक्रमे दानिल दुबॉव आणि नेपोम्नियाची यांचा पहिल्या दोन फेरीत पराभव करीत आनंदने स्पर्धेत आघाडी घेतली! पण तिसऱ्या फेरीत मात्र त्याला मामेद्यारोव कडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला!

आनंदचा दृढ आत्मविश्वास!
मामेद्यारोव विरुद्ध पराभव झाल्यावर खचून न जाता आनंदने अनुक्रमे स्विडलर आणि क्रॅमनिक यांच्या विरुद्ध आपले डाव बरोबरीत सॊडवले!
अनुक्रमे सहाव्या फेरीत नाकामुरा आणि आठव्या फेरीत ग्रीश्चुक यांना पराभूत करीत आनंदने स्पर्धा जिंकण्याच्या दिशेने वाटचाल केली! आठव्या फेरीत दानिल दुबॉव ने मामेद्यारोवला पराभवाचा धक्का दिला तसेच आठव्या आणि नवव्या फेरीत नाकामुराला सलग दन बरोबरी स्वीकाराव्या लागल्यामुळे आनंदचा मार्ग मोकळा झाला! आनंदने ही स्पर्धा आपल्या निकटतम प्रतिस्पर्ध्यांपेक्षा एक गुणांच्या आघाडीने मोठ्या दिमाखात जिंकली!

स्वतःच्या तयारीशी एकनिष्ठ आनंद!
दुसऱ्या फेरीत नेपोम्नियाची विरुद्ध खेळली व्यूहरचना ९व्या आणि शेवटच्या फेरीत गेलफंड विरुद्ध खेळण्यास आनंद जर सुद्धा कचरला नाही! गेलफंडच्या काही तासांच्या तयारी समोर स्वतःच्या तयारीशी आनंद जास्त एकनिष्ठ राहिला! तसेच क्रॅमनिक विरुद्ध खेळली व्यूहरचना नाकामुरा विरुद्ध खेळण्यास आनंद जास्त उत्सुक दिसून आला! क्रॅमनिक प्रमाणे नाकामुरा विरुद्ध वजिरा-वजिरी स्वीकारून सुद्धा डावातील तांत्रिक भिन्नता ओळखून त्याने 'नाकामुरा' वर विजय संपादन केला हे विशेष! तसेच कास्परॉव ने ह्या सारख्या परिस्थती मध्ये 'नाकामुरा' वर विजय संपादन केला होता ही तांत्रिक बाब त्याने प्रेक्षकांना दाखवून दिली!

चांगली चाल किंवा व्यूहरचना दिसल्यास न कचरणारा आनंद!
'लाइटनिंग किड' ह्या नावाने प्रसिद्ध असलेला आनंद ह्या स्पर्धेत तितक्याच जलद गतीने बुद्धिबळ खेळताना दिसला! त्याच्या कुठल्याच प्रतिस्पर्ध्यां विरुद्ध तो वेळेच्या कचाट्यात अडकला नाही हे विशेष! परिणामस्वरूपी प्रतिस्पर्ध्यां विरुद्ध विचार करायला त्याच्या कडे नेहमीच जास्त वेळ होता! ग्रीश्चुक विरुद्ध चांगली चाल किंवा व्यूहरचना करण्यासाठी आनंदने ४ ते ५ मिनिटे विचार केला! ग्रीश्चुक ह्या व्यूहरचनेत अडकला आणि चूक केली. या चुकीचा फायदा उठवीत आनंदने यंत्राप्रमाणे अचूक आणि सुरेख चाली रचत ग्रीश्चुकवर मात केली!

टायगर जिंदा हैं और ज्यादा खतरनाक हैं !
लहानपणी 'लाइटनिंग किड' ह्या नावाने प्रसिद्ध असलेला आनंद बुद्धिबळाच्या नकाशावर झळकला आणि तेव्हां पासून 'द टायगर ऑफ मद्रास' ह्या नावाने ओळखला जाऊ लागला.

(लंडन चेस क्लासिक २०१७ नंतर) ज्या लोकांनी आनंद संपला अशी वक्तव्यं केली होती, त्या सर्वांना आनंदने वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा जिंकून, ‘टायगर जिंदा है’ असा ईशारा दिला होता! ताल स्मृती रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा जिंकत त्याने आपली दहशत आणि दरारा कायम असल्याची ग्वाही पुन्हा एकदा दिली आहे !!!

 

Web Title: Vishwanathan Anandne Talent Rapid Chess Championship!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.