ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - आपल्या आयुष्यात पाण्याचं किती महत्वा आहे हे सांगायची गरज नाही. पाणी म्हणजे जीवन. एखाद्या दिवशी जेवणं नाही मिळालं तरी चालेल, पण पिण्यासाठी पाणी नाही मिळालं तर माणसाला काही सुचत नाही. पाणी प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा भाग आहे. अनेकजण बाहेर जाताना आपल्यासोबत पाण्याची बाटली ठेवतात. जेणेकरुन पिण्याचं पाणी बाहेरुन खरेदी करायची गरज नाही. बाहेर मिळणा-या पाण्याच्या बाटल्यांची किंमत पाहिली तर दोन वेळचं जेवण स्वस्त वाटतं. पण दुसरीकडे अनेक क्रिकेटर्स आणि सेलिब्रेटी असे आहेत ज्यांचं पिण्याचं पाणी परदेशातून येतं. इतकंच नाही त्या पाण्याची किंमतही खूप जास्त आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण सेलिब्रेटी एक लिटर पाण्यासाठी हजारो रुपये खर्च करतात.
 
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचंही पिण्याचं पाणी परदेशातून येतं. विराट कोहली "एव्हिअन" मिनरल वॉटर ब्रॅण्डचं पाणी पितो. फ्रान्सहून त्याच्यासाठी हे पाणी मागवलं जातं. या ब्रॅण्डच्या एक लिटर पाण्याच्या बाटलीची किंमत 600 रुपये आहे. विराट कोहलीप्रमाणे अनेक सेलिब्रेटी आहेत जे एक लिटर पाण्यासाठी 36 हजार रुपयांपर्यंत खर्च करतात.