सेहवाग अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेत

By admin | Published: April 3, 2017 11:02 AM2017-04-03T11:02:17+5:302017-04-03T11:22:48+5:30

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेसाठी चर्चिलं जात असल्याची बातमी एक एप्रिल रोजी न्यूयॉर्क टाईम्सने दिली आहे.

Sehwag is the President of the United States | सेहवाग अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेत

सेहवाग अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेत

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - मुलतानचा सुलतान वीरेंद्र सेहवाग आपल्या ट्विटमुळे आजकाल जास्तच चर्चेत असतो. आधी क्रिकेटचे मैदान गाजवणारा सेहवाग निवृत्तीनंतर सोशल मीडियावर चौकार षटकारांची आतषबाजी करत ऑनलाईन मैदान गाजवत आहे. पण आता त्याचं नाव अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेसाठी चर्चिलं जात असल्याची बातमी एक एप्रिल रोजी न्यूयॉर्क टाईम्सने दिली आहे. हे वाचून अनेकांना अश्चर्याचा धक्का बसला असेल. पण याबातच्या एका बातमीचं कात्रण सेहवागनं आपल्या ट्विटर अकाऊंटवर 1 एप्रिल रोजी पोस्ट केलं आहे. सेहवागने पोस्ट केलेल्या न्यूयॉर्क टाईम्सच्या कात्रणात म्हटलंय की, सेहवागचं नाव अमेरिकेच्या पुढील राष्ट्राध्यक्ष पदाच्या स्पर्धेत आहे. यासाठी तो नेहमी अमेरिकेत येतो, आणि सातत्याने तो ट्रम्प सरकारच्या संपर्कात आहे. तसेच या बातमी खाली लेखकाचं नाव स्टिफन स्मिथ असं आहे. विशेष म्हणजे, या कात्रणावर अमेरिकेतलं प्रसिद्ध न्यूयॉर्क टाईम्स नाव आहे.
या वृत्तात पुढं म्हणलंय की, अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, आणि माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा विरेंद्र सेहवागचे चाहते आहेत. या दोघांचेही सेहवागला राष्ट्रध्यक्षपदाची जबाबदारी देण्यावर एकमत झालं आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यावेळीही ट्रम्प मोदींसोबत याविषयावर चर्चा करणार आहेत असेही यामध्ये म्हटल आहे. सेहवागने पोस्ट केलेल्या या ट्वीटला त्याच्या चाहत्यांनीही डोक्यावर घेतलं आहे. या पोस्टवर अनेक प्रकराच्या प्रतिक्रीया मिळत आहेत.

Web Title: Sehwag is the President of the United States

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.