रॉजर फेडररमुळे तो झाला कोट्याधीश

By admin | Published: July 16, 2017 10:00 PM2017-07-16T22:00:19+5:302017-07-16T22:04:58+5:30

हिरवळीवरचा राजा असा लौकिक असलेल्या रॉजर फेडररने आज विम्बल्डनमध्ये विजयी चषक उंचावताच त्याचा चाहता कोट्यधीश झाला आहे.

Roger Federer has become the quota for the quarter | रॉजर फेडररमुळे तो झाला कोट्याधीश

रॉजर फेडररमुळे तो झाला कोट्याधीश

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - रॉजर फेडररनं आज आवव्यांदा विम्बल्डनच्या विजेतेपदाला गवसणी घातली तर कारकिर्दीतील 19 वे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावले. हिरवळीवरचा राजा असा लौकिक असलेल्या रॉजर फेडररने आज विम्बल्डनमध्ये विजयी चषक उंचावताच त्याचा चाहता कोट्यधीश झाला आहे.
फेडरर आज कोर्टवर खेळण्यासाठी उतरला तेव्हा त्या लाखो चाहत्यांच्या अपेक्षांचं ओझं त्याच्या डोक्यावर होतं. फेडररच जिंकणार या विश्वासाने त्याच्यावर तब्बल 50 हजार युरो म्हणजे सुमारे 36 लाख रुपयांची पैज लंडनमध्ये राहणाऱ्या जॉर्जनं लावली होती. फेडररनं आजचा सामना सरळ तीन सेटमध्ये जिंकल्यामुळे त्यानं ही पैज जिंकली आणि तो मालामाल झाला. पैज जिंकल्यामुळे जॉर्जला 1 लाख 62 हजार युरो म्हणजेच 1 कोटी 19 लाख 41 हजार रुपये मिळाले आहेत.
जॉर्ज हा एका टेक कंपनीचा हेड आहे. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या रकमेची पैज लावल्याचं त्याने आपल्या गर्लफ्रेण्डलाही सांगितलेलं नव्हतं. ह्यमाझी गर्लफ्रेण्ड फारशी टेनिस पाहत नाही. त्यामुळे तिला याची कल्पना दिलेली नाही. मी फारशा पैजा लावत नाही. पण जेव्हा बेट लावतो, तेव्हा ती जिंकेन याची खात्री असेल तरच. असं जॉर्ज मॅचपूर्वी म्हणाला होता. या मोसमात फेडररने तीन विजेतेपदं मिळवल्यामुळे जॉर्जचा आत्मविश्वास दुणावला होता.
आज झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत मारिन सिलिचवर 6-3, 6-1, 6-4 अशी सरळ सेटमध्ये मात करत फेडररने विक्रमी आठव्यांदा विम्बल्डनच्या विजेतेपदाला गवसणी घातली. स्वीत्झर्लंडच्या या महान खेळाडूच्या आव्हानाचा सामना करणे प्रतिस्पर्धी मारिन सिलिचला शक्य झाले नाही. पहिला गेम जिंकत सिलिचने चांगली सुरुवात केली. पण त्यानंतर फेडररच्या आव्हानासमोर त्याची डाळ शिजली नाही.
पहिल्या सेटमध्ये 6-3 ने बाजी मारल्यानंतर फेडररने सिलिचसाठी पुनरागमनाची कोणतीही वाट ठेवली नाही. दुसऱ्या सेटमध्ये सिलिच फेडररच्या आक्रमणापुढे पूर्णपणे निष्प्रभ झालेला दिसला. त्याचा फायदा उठवत फेडररने हा सेट 6-1 अशा फरकाने खिशात घातला. त्यानंतर तिसरा सेट 6-4 ने जिंकून फेडररने सामन्यासह विम्बल्डनच्या आठव्या विजेतेपदावर अगदी दिमाखात कब्जा केला.
तत्पूर्वी उपांत्य फेरीत ३५ वर्षीय फेडररने झेक प्रजासत्ताच्या ३१ वर्षीय थॉमस बर्डिचचे कडवे आव्हान 7-6, 7-6, 6-4 असे परतवले होते. तर पहिल्यांदाच विम्बल्डनची अंतिम सिलिचने गाठताना अमेरिकेच्या सॅम क्युरे याला नमवले होते. दोन तास 56 मिनिटांपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात सिलिचने क्युरेला 7-6, 4-6, 7-6, 7-5 असे पराभूत केले.

Web Title: Roger Federer has become the quota for the quarter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.