राहुल आवारे होणार पोलीस उपअधीक्षक; ललिता बाबर उपजिल्हाधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 12:38 AM2018-09-07T00:38:39+5:302018-09-07T00:39:22+5:30

आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राहुल आवारे याची पोलीस उपअधीक्षक पदी निवड झाली असून, आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबरला उपजिल्हाधिकारीपदाचा मान मिळाला आहे.

Rahul will be the Deputy Superintendent of Police; Lalitha Babur Deputy Collector | राहुल आवारे होणार पोलीस उपअधीक्षक; ललिता बाबर उपजिल्हाधिकारी

राहुल आवारे होणार पोलीस उपअधीक्षक; ललिता बाबर उपजिल्हाधिकारी

Next

पुणे : आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राहुल आवारे याची पोलीस उपअधीक्षक पदी निवड झाली असून, आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबरला उपजिल्हाधिकारीपदाचा मान मिळाला आहे. यांच्यासह ३२ खेळाडूंची थेट शासकीय सेवेत निवड झाली असून, त्यात ९ दिव्यांग खेळाडूंचाही समावेश आहे.
खेळाच्या माध्यमातून राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट सरकारी सेवेत नियुक्ती मिळावी यासाठी मुख्यसचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीची ३ आॅगस्ट २०१८रोजी बैठक झाली. त्यात ३२ खेळाडूंना थेट सरकारी नोकरीत नियुकत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला. शिपाई, लिपिक, क्रीडा मार्गदर्शक, तालुका क्रीडा अधिकारी, नायब तहसिलदार, पोलीस उपअधिक्षक आणि उपजिल्हाधिकारी अशा पदांवर खेळाडूंची नियुक्ती करण्यात आली आहे. निवड झालेल्या खेळाडूंच्या पदस्थापनेचे आदेश संबंधित विभागाने काढावेत असा राज्यसरकारने दिला आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेता कुस्तीपटू आवारे याने २०११मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक आणि आशियाई स्पर्धेत ब्रॉंझ पदक संपादन केले होते. तर, २०१८मध्ये गोल्ड कोस्ट येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्ण पदक संपादन केले पाहीजे. ललिता बाबरने २०१५ साली वुहान येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्ण, तर २०१४ सालच्या स्पर्धेत रौप्य पदक संपादन केले होते.
पोलीस उपअधिक्षकपदी निवड झाल्यानंतर लोकमतशी बोलताना आवारे म्हणाला, लहानपणापासून पोलीस बनण्याचे स्वप्न होते. ते या निमित्ताने पूर्ण झाले. मात्र या पुढेही कुस्तीचा सराव सुरु ठेवून, आॅलिम्पिक पदक मिळवून देण्याचा मानस आहे.

लहानपणी वडिलांकडे धरला होता ‘वर्दी’चा हट्ट - आवारे
कारगील युद्धामुळे देशसेवा आणि वर्दीचे आकर्षण वाढले. मी साधरण तिसरी चौथीत असतानाची गोष्ट आहे. माझे परिचित पोलिस खात्यात होते. त्यामुळे वडिलांकडे तशीच पोलीस वर्दी हवी असा हट्ट धरला होता. त्यावेळी घरची परिस्थिती हट्ट पुरविण्याची नव्हती. तरी देखील वडीलांनी तसा पोषाख आणून दिला.

आज खेळाच्या माध्यमातून मला खरीखुरी वर्दी मिळाली आहे. ज्या प्रमाणे मी खेळाच्या माध्यमातून देशाचा नावलौकीक केला. त्याप्रमाणे पोलीसांची वर्दी घालून समाजाची सेवा करेन. तूर्तास देशाला आॅलिम्पिक पदक मिळवून देण्याचा मानस आहे. त्याच्या तयारीत खंड पडू देणार नाही, अशी प्रतिक्रिया राहुल आवारे याने लोकमतकडे दिली.

दिव्यांग खेळाडू
खेळाडूंची नावे खेळाचा प्रकार पद
प्रकाश मोहारे पॉवरलिफ्टींग ता. क्रीडा अधिकारी
सुकांत कदम बॅडमिंटन ता. क्रीडा अधिकारी
मार्क धरमाई बॅडमिंटन ता. क्रीडा अधिकारी
रुही सतीश शिंगाडे बॅडमिंटन ता. क्रीडा अधिकारी
सुयश जाधव जलतरण क्रीडा मार्गदर्शक
कांचनमाला पांडे जलतरण क्रीडा मार्गदर्शक
इंदिरा गायकवाड पॉवरलिफ्टींग लिपिक
दिनेश बालगोपाल टेबल टेनिस लिपिक
ओम लोटलीकर टेबल टेनिस लिपिक

थेट नियुक्त झालेले खेळाडू
खेळाडू खेळाचा प्रकार पद
राहुल आवारे कुस्ती पोलीस उपअधीक्षक
ललिता बाबर धावपटू उपजिल्हाधिकारी,
महसूल-वन विभाग
अमित निंबाळकर पॉवरलिफ्टींग नायब तहसिलदार,
महसूल व वन
जयलक्ष्मी धनुर्विद्या ता. क्रीडा अधिकारी
सारीकोंडा
भक्ती आंब्रे पॉवरलिफ्टींग ता. क्रीडा अधिकारी
अंकिता मयेकर पॉवरलिफ्टींग ता. क्रीडा अधिकारी
सारीका काळे खो-खो ता. क्रीडा अधिकारी
सुप्रिया गाढवे खो-खो ता. क्रीडा अधिकारी
विजय शिंदे पॉवरलिफ्टींग ता. क्रीडा अधिकारी
सचिन चव्हाण रायफल शुटींग ता. क्रीडा अधिकारी
संजीवनी जाधव मैदानी ता. क्रीडा अधिकारी
सायली जाधव कबड्डी ता. क्रीडा अधिकारी
मोनिका आथरे मैदानी लिपिक
स्वप्नील तांगडे तलवारबाजी लिपिक
आनंद थोरात जिम्नॅस्टीक लिपिक
सिद्धार्थ कदम जिम्नॅस्टीक लिपिक
मानसी गावडे जलतरण लिपिक
नेहा साप्ते रायफल शुटींग लिपिक
रोहित हवालदार जलतरण लिपिक
देवेंद्र वाल्मिकी हॉकी लिपिक
युवराज जाधव खो-खो शिपाई
बाळासाहेब खो-खो शिपाई
पोकार्डे
कविता घाणेकर खो-खो शिपाई

Web Title: Rahul will be the Deputy Superintendent of Police; Lalitha Babur Deputy Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस