Phadkal tricolor in Pyongyechong | प्योंगच्योंगमध्ये फडकला तिरंगा
प्योंगच्योंगमध्ये फडकला तिरंगा

प्योंगच्योंग (द. कोरिया) : येथे सुरू होणा-या हिवाळी आॅलिम्पिकच्या एक दिवस अगोदर सहभागी संघांच्या स्वागत समारंभावेळी आॅलिम्पिक गावात भारताचा तिरंगा फडकविण्यात आला.
भारतीय खेळाडूंच्या पथकाचे प्रमुख हरजिंदर सिंग, शिव केशवन व क्रीडा ग्रामचे महापौर या कार्यक्रमाला उपस्थित होते. हरजिंदर म्हणाला, ‘क्रीडा ग्रामच्या महापौरांनी भारतीय पथकाचे औपचारिक स्वागत केले. या कायक्रमात तिरंगा फडकविण्यात आला. भारताचे प्रतिनिधित्व करण्यास मिळणे हे आमचे भाग्य आहे.’ तो म्हणाला, ‘आयोजकांनी खूप चांगली व्यवस्था केली आहे. येथील तापमान उणे २० अंश सेल्सिअस इतके आहे.’
क्रॉस कंट्री प्रकारातील खेळाडू जगदीश सिंग अद्याप संघाबरोबर नसला तरी उद्या तो येथे पोहोचणार आहे. केशवनचा सहभाग असलेल्या ल्यूज पुरुष एकेरीचा सामना १० व ११ फेबु्रवारी रोजी होणार आहे, तर जगदीशची नोर्डीक स्की स्पर्धा १६ फेबु्रवारी रोजी होणार आहे. हरजिंदर सहाव्यांदा हिवाळी आॅलिम्पिकमध्ये सहभागी होत आहे. (वृत्तसंस्था)
>जगदीश सिंग लवकरच जुळेल
क्रॉस कंट्री प्रकारातील जगदीश सिंग अद्याप भारतीय संघाशी जुळला नसून तो शुक्रवारी संघामध्ये सहभागी होईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. जगदीश ४ फेब्रुवारीलाच केशवनसह क्रीडा गावात आला असता. परंतु, प्रशिक्षक म्हणून त्याच्यासोबत कोण येणार याबाबत गोंधळ उडाल्याने स्पर्धेसाठी रवाना होण्यास जगदीशला विलंब झाला होता.


Web Title: Phadkal tricolor in Pyongyechong
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.