पीसीबी फिक्सिंगची चौकशी करणार

By admin | Published: July 17, 2017 12:37 AM2017-07-17T00:37:13+5:302017-07-17T00:37:13+5:30

स्पॉट फिक्सिंग प्रकरणात कथितपणे दोन खेळाडू सहभागी होते अथवा नाही याविषयीचा पाकिस्तानी क्रिकेट मंडळ (पीसीबी) चौकशी करणार आहे

PCB fixing inquiry | पीसीबी फिक्सिंगची चौकशी करणार

पीसीबी फिक्सिंगची चौकशी करणार

Next

कराची : स्पॉट फिक्सिंग प्रकरणात कथितपणे दोन खेळाडू सहभागी होते अथवा नाही याविषयीचा पाकिस्तानी क्रिकेट मंडळ (पीसीबी) चौकशी करणार आहे, असा दावा प्रसिद्धीमाध्यमांनी केला आहे.
‘जंग’ या वृत्तपत्रानुसार गेल्या गुरुवारी मंडळाच्या तीन सदस्यीय भ्रष्टाचारविरोधी समितीसमोर ब्रिटनच्या राष्ट्रीय क्राइम एजन्सीत संचालन अधिकाऱ्यांच्या विधानादरम्यान सातत्याने फलंदाज उमर अकमल आणि वेगवान गोलंदाज मोहंमद समी यांचे नाव समोर आले. सूत्रांनुसार ‘विधानात त्यांच्या नावाचा उल्लेख आहे आणि सट्टेबाज मोहम्मद युसूफने अनेक वेळा त्यांचे नाव घेतल्याचा एनसीए अधिकाऱ्याने खुलासा केला होता.’
काही महिन्यांपूर्वी उमरला दोनदा पाकिस्तान संघातून बाहेर करण्यात आले आहे. तो वेस्ट इंडीज दौरा आणि चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरला होता. मोहंमद समी मार्च २०१६ नंतर पाकिस्तानकडून खेळत नाही. तेव्हा तो विश्वचषक टी-२० स्पर्धेत आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: PCB fixing inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.