ओझाचे दुहेरी ‘नमन’

By admin | Published: July 8, 2014 01:56 AM2014-07-08T01:56:51+5:302014-07-08T01:56:51+5:30

दुस:या दिवसअखेर पहिल्या डावात 475 असा मजबूत स्कोअर उभा केला़ प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया ‘अ’ची 6 बाद 126 अशी घसरगुंडी उडाली आह़े

Ojha's double 'Naman' | ओझाचे दुहेरी ‘नमन’

ओझाचे दुहेरी ‘नमन’

Next
ब्रिसबेन : नमन ओझाचे (नाबाद 219) शानदार द्विशतक आणि जसप्रीत बुम्राहची (3 बळी) सुरेख गोलंदाजी या बळावर भारत ‘अ’ संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चारदिवसीय सामन्यात दुस:या दिवसअखेर पहिल्या डावात 475 असा मजबूत स्कोअर उभा केला़ प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया ‘अ’ची 6 बाद 126 अशी घसरगुंडी उडाली आह़े
भारत ‘अ’ संघाने एकूण 13क् षटके खेळ करताना 9 बाद 475 धावा करीत आपला डाव घोषित केला़ यानंतर ऑस्ट्रेलियाने दुस:या दिवसाचा खेळ  संपेर्पयत 44़4 षटकांत 6 बाद 126 धावांर्पयत मजल मारली होती़ ऑस्ट्रेलिया संघ भारताच्या धावसंख्येपेक्षा अजूनही 349 धावांनी मागे आह़े अद्याप त्यांचे केवळ चार गडी शिल्लक आहेत़ दुस:या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मिशेल मार्श 18 आणि सॅम व्होईटमॅन 12 धावांवर खेळत होता़ त्याआधी सकाळी भारताने 6 बाद 3क्4 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली़ तेव्हा नमन ओझा 82 आणि धवल कुलकर्णी 12 धावांवर खेळत होत़े नमन ओझा याने कारकिर्दीतली सवरेत्कृष्ट खेळी करताना 25क् चेंडूंत 29 चौकार आणि 8 षट्कारांसह नाबाद 219 धावांची खेळी साकारली़ धवल कुलकर्णी याने 33 धावांची उपयोगी खेळी केली़ त्याने 64 चेंडूंना सामोरे जाताना 6 चौकार लगावल़े
ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून बोयसे याने सुरेख गोलंदाजी करताना 4 गडी बाद केल़े बेन कटिंग आणि मिशेल मार्श यांना प्रत्येकी 2 बळी मिळाल़े
ऑस्ट्रेलिया ‘अ’कडून फिलिप ह्युज (34) आणि एलेक्स डुलन (12) यांनी पहिल्या गडय़ासाठी 33 धावांची भागीदारी रचली़ मात्र, बुम्राहने नवव्या षटकांत डुलनला पायचीत करीत ही जोडी फोडली़ पीटर फॉरेस्ट याने 16 धावांची खेळी केली़ मात्र, यानंतर एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही़ भारत ‘अ’कडून जसप्रीत बुम्राह याने 42 धावांत 3 गडी बाद केले, तर यादव, कुलकर्णी, प्रज्ञान ओझा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला़
 
संक्षिप्त धावफलक :
भारत ‘अ’ : एकूण 13क् षटकांत 9 बाद 475़ (नमन ओझा नाबाद 219, धवल कुलकर्णी 33, मनोज तिवारी 83, जीवनज्योत सिंह 56़ पीटर फॉरेस्ट 4/146, मिशेल मार्श 2/54, बेन कटिंग 2/1क्4)़ 
ऑस्ट्रेलिया ‘अ’ : 44़4 षटकांत 6 बाद 126़ (फिलिप ह्युजसे 34, अॅलेक्स डुलन 12, पीटर फॉरेस्ट 16, ािस लेन 2क्, मिशेल मार्श नाबाद 18, सॅम व्होईटमॅन नाबाद 13़ जसप्रीत बुम्राह 3/42, उमेश यादव 1/5क्, धवल कुलकर्णी 1/1क्, प्रज्ञान ओझा 1/21)़ 

 

Web Title: Ojha's double 'Naman'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.