महाराष्ट्र केसरीची समीकरणे भाग्यक्रमांक सोडवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 01:22 AM2017-12-22T01:22:16+5:302017-12-22T01:22:29+5:30

प्रचंड उत्सुकता, कुस्तीप्रेमींचे अंदाज, मार्गदर्शकांचे तर्कवितर्क आजच्या महाराष्ट्र केसरीच्या भाग्यक्रमांकाने एकदम फोल ठरले गेले. वीर योद्धात्मा विजयश्री खेचून आणण्यासाठी स्वत:च्या भात्यात वेगवेगळी अस्त्रे असावी लागतात. अगदी त्याचप्रमाणे कुस्तीगिराला पदकाला गवसणी घालण्यासाठी डावांच्या अस्त्रांबरोबरच भाग्यक्रमांकाचे ब्रह्मास्त्रही मोलाचे ठरते.

 Maharashtra Kesari will solve the Future Indexes Equation | महाराष्ट्र केसरीची समीकरणे भाग्यक्रमांक सोडवणार

महाराष्ट्र केसरीची समीकरणे भाग्यक्रमांक सोडवणार

Next

प्रचंड उत्सुकता, कुस्तीप्रेमींचे अंदाज, मार्गदर्शकांचे तर्कवितर्क आजच्या महाराष्ट्र केसरीच्या भाग्यक्रमांकाने एकदम फोल ठरले गेले.
वीर योद्धात्मा विजयश्री खेचून आणण्यासाठी स्वत:च्या भात्यात वेगवेगळी अस्त्रे असावी लागतात. अगदी त्याचप्रमाणे कुस्तीगिराला पदकाला गवसणी घालण्यासाठी डावांच्या अस्त्रांबरोबरच भाग्यक्रमांकाचे ब्रह्मास्त्रही मोलाचे ठरते.
महाभारतात कर्णाने अनेक विद्या हस्तगत केल्या; परंतु प्रत्येक वेळी त्याला विद्येबरोबर शापही मिळाले. किती विचित्र योगायोग होता.
अगदी तसाच योगायोग आज महाराष्ट्र केसरीच्या भाग्यक्रमांकात दिसून आला. गतवर्षीच उप महाराष्ट्र केसरी अभिजित कटके आणि पुणे जिल्ह्याचा महाबली शिवराज राक्षे याच भाग्य क्रमांकामुळे पहिल्याच फेरीत लढणार आहेत.
एवढेच नव्हे तर लगेच दुसºया फेरीत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील पहिल्या फेरीत विजयी झाल्यानंतर दुसºया फेरीत अभिजित आणि शिवराज यांच्यातील विजेत्यांशी लढणार म्हणजेच महाराष्ट्र केसरीचे प्रबळ दावेदार एकमेकांबरोबर पहिल्या, दुसºया फेरीतच लढणार आहेत. अगदी दोन्ही पोलमध्ये हीच परिस्थिती विक्रांत जाधव विरुद्ध सागर विराजदार ही लढतदेखील पहिल्याच फेरीत!
हीच परिस्थिती माती विभागात दिसून येते. ज्यांच्याकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जाते, ते किरण भगत आणि ज्ञानेश्वर जमदाडे दुसºयाच फेरीत लढणार आहेत. एकूणच भाग्यक्रमांकाने महाराष्ट्र केसरी किताबाला पहिल्या फेरीपासूनच उत्कंठावर्धक परिस्थिती निर्माण केली आहे.
जणू काही महाराष्ट्र केसरीचे गादी व माती विभागाचे प्रबळ दावेदार उद्याच निश्चित करायचे आहेत की काय?
फक्त मुळशी तालुकाच नाही, तर संपूर्ण पुणे जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींच्या चर्चेत हाच विषय आहे.
कार्तिकी, आषाढीला वारकºयांच्या दिंड्या जशा आळंदी, पंढरपूरकडे निघतात, अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील कुस्तीशौकिनांची पावले भूगावकडे भल्या सकाळीच निघणार आहेत. उद्याच्या अविस्मरणीय दिवसात कुस्तीशौकिनांना मिळणारा कुस्ती नजराणा नक्कीच अनोखा असेल!
-दिनेश गुंड
आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच

Web Title:  Maharashtra Kesari will solve the Future Indexes Equation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.