लुकास पाऊलीची झुंजार आगेकूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:36 AM2018-05-16T00:36:10+5:302018-05-16T00:36:10+5:30

फ्रान्सच्या लुकास पाऊली याने तीन सेटपर्यंत रंगलेल्या रोमांचक लढतीत बाजी मारताना इटालियन ओपन एटीपी स्पर्धेत विजयी आगेकूच केली.

Lukas Bollinger ahead | लुकास पाऊलीची झुंजार आगेकूच

लुकास पाऊलीची झुंजार आगेकूच

googlenewsNext

रोम : फ्रान्सच्या लुकास पाऊली याने तीन सेटपर्यंत रंगलेल्या रोमांचक लढतीत बाजी मारताना इटालियन ओपन एटीपी स्पर्धेत विजयी आगेकूच केली. लुकासने इटलीच्याच अँड्रीस सेप्पी याचे कडवे आव्हान २-१ असे परतावले.
पहिला सेट ६-२ असा सहजपणे जिंकून आघाडी घेतलेल्या लुकासला दुसऱ्या सेटमध्ये सेप्पीकडून कडवी झुंज मिळाली. सेप्पीने दुसरा सेट ६-३ असा जिंकत सामना निर्णायक तिसºया सेटमध्ये नेला. यावेळी दोघांनीही तोडीस तोड खेळ करत सेट टायब्रेकमध्ये नेला. यावेळी, लुकासने संयमी खेळ करताना सेप्पीला दडपणाखाली आणले आणि अखेर ७-६ (७-३) अशी बाजी मारत झुंजार विजय मिळवला. (वृत्तसंस्था)

Web Title: Lukas Bollinger ahead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.