आंतरविद्यापीठ राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवात खेळाडूंची परवड, निवाऱ्यासाठी वणवण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 06:35 PM2019-02-13T18:35:03+5:302019-02-13T18:35:32+5:30

मुंबईत आलेल्या खेळाडूंना निवासस्थानासाठी ताटकळत उभे राहावे लागले.

At the inter-state level sports festival players not get facilities | आंतरविद्यापीठ राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवात खेळाडूंची परवड, निवाऱ्यासाठी वणवण

आंतरविद्यापीठ राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवात खेळाडूंची परवड, निवाऱ्यासाठी वणवण

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठ येथे 13 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत आंतरविद्यापीठ राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात राज्यातील 18 विद्यापाठांनी सहभाग घेतला आहे, परंतु स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ढिसाळ नियोजनाचा फटका खेळाडूंना बसल्याची घटना समोर आली आहे. 

राज्यात दरवर्षी अनुक्रमे राज्यस्तरीय आंतरविद्यापाठी क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. हे महोत्सव 27 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येणार होते. मात्र, यावर्षी स्पर्धा आयोजनाचा मान मुंबईला मिळाला आणि दोन वेळा स्पर्धेची तारीख बदलण्यात आली. पण, येथे खेळाडूंना निवासव्यवस्थेसाठी झगडावे लागले. निवास व्यवस्थेसाठीच्या खोलीत कोणतीच सुविधा नसल्याचे समोर आले. बुधवारी सकाळी मुंबईत आलेल्या खेळाडूंना निवासस्थानासाठी ताटकळत उभे राहावे लागले.

जवळपास २५०० विध्यार्थी या महोत्सवासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. क्रीडा विभागाच्या या ढिसाळ नियोजनाचा सर्वाधिक फटका मुलींना बसत आहे.

Web Title: At the inter-state level sports festival players not get facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.