मुंबई इंडियन्समधून हसी, प्रवीण आउट

By admin | Published: November 5, 2014 12:27 AM2014-11-05T00:27:55+5:302014-11-05T00:27:55+5:30

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा संघ मुंबई इंडियन्सने २0१५साठी प्रवीण कुमार आणि मायकल हसी यांना संघातून आऊट करताना उन्मुक्त चंद आणि आर. विनय कुमार यांना आपल्या संघात समाविष्ट करून घेतले.

Hussey, Pravin Out from Mumbai Indians | मुंबई इंडियन्समधून हसी, प्रवीण आउट

मुंबई इंडियन्समधून हसी, प्रवीण आउट

Next

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चा संघ मुंबई इंडियन्सने २0१५साठी प्रवीण कुमार आणि मायकल हसी यांना संघातून आऊट करताना उन्मुक्त चंद आणि आर. विनय कुमार यांना आपल्या संघात समाविष्ट करून घेतले.
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने मंगळवारी २0१५ च्या स्पर्धेची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार आयपीएल पुढील वर्षी ८ एप्रिल ते २४ मेदरम्यान खेळवले जाणार आहे. याशिवाय २0१६ आणि २0१७ च्या वेळापत्रकाचीही घोषणा केली आहे. २0१६ मध्ये स्पर्धा ८ एप्रिल ते २९ मे, तर २0१७ मध्ये ५ एप्रिल ते २१ मेदरम्यान होणार आहे.
२0१५साठी आयपीएल फँ्रचायजी मुंबईने एक मोठा बदल करताना आपले दोन खेळाडू फलंदाज हसी आणि मध्यमगती गोलंदाज प्रवीण कुमारला संघातून रिलीज केले आहे. हे दोन्ही खेळाडू पुढील वर्षासाठी खेळाडूंच्या लिलावाकरिता उपलब्ध असतील. त्यांच्या जागेवर मुंबईने आपल्या पहिल्या ट्रेडिंग विंडोनुसार राजस्थानचा फलंदाज उन्मुक्त चंद आणि कोलकाता नाईट रायडर्सचा आर. विनय कुमार यांना आपल्या संघात स्थान दिले आहे. आयपीएल २0१५ साठी ट्रेडिंग विंडो ६ आॅक्टोबरला सुरू झाली होती.
आयपीएल २0१४ मध्ये हसीची कामगिरी खूप निराशाजनक झाली होती आणि त्याने त्याच्या ९ डावांत २३ च्या सरासरीने ११४ च्या स्ट्राईक रेटनुसार फक्त २0९ धावा केल्या होत्या, तर मेरठच्या प्रवीणने मुंबईसाठी तीन सामने खेळले होते आणि ६.५0 च्या सरासरीने ३ विकेट घेतल्या होत्या. दुसरीकडे राजस्थानचा खेळाडू उन्मुकत्ने या हंगामात त्याच्या संघाकडून फक्त एकच सामना खेळला होता, तर विनयने ८.७८ च्या धावसरासरीने ९ सामन्यांत ७ गडी बाद केले होते. आयपीएलचा पहिला ट्रेडिंग विंडो १२ डिसेंबरला संपेल. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Hussey, Pravin Out from Mumbai Indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.