बेल्जियमकडून हंगेरी पराभूत

By Admin | Published: June 27, 2016 06:50 PM2016-06-27T18:50:36+5:302016-06-27T19:07:05+5:30

टोबी एल्डरवेरेल्ड, मिशी बातशुआई, ईडन हजार्ड, यानिक कारस्को यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर बेल्जियम संघाने युरो करंडक स्पर्धेत हंगेरीचा ४-० गोलने पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

Hungary defeats Belgium | बेल्जियमकडून हंगेरी पराभूत

बेल्जियमकडून हंगेरी पराभूत

googlenewsNext
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">युरो फुटबॉल : ४-० गोलने केली मात करीत उपांत्यपूर्व फेरीत
टोलुसे (फ्रान्स) : टोबी एल्डरवेरेल्ड, मिशी बातशुआई, ईडन हजार्ड, यानिक कारस्को यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एक गोलच्या जोरावर बेल्जियम संघाने युरो करंडक स्पर्धेत हंगेरीचा ४-० गोलने पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.  बेल्जियम संघाने १९८० मध्ये अंतिम फेरीत पराभूत झाल्यानंतर प्रथमच युरो कपच्या उपांत्यपूर्व जागा मिळविली आहे.  
सामन्याच्या सुरुवातीपासूनच बेल्जियम संघाच्या आघाडीच्या फळीने अफलातून चाली रचत हंगेरीच्या खेळाडूंना दबावाखाली आणण्यास सुरुवात केली. त्यातच १० व्या मिनिटाला बेल्जियमच्या टोबी एल्डरवेरेल्डला मिळालेल्या संधीचा फायदा घेत त्याने संघाचा पहिला गोल केला. त्यानंतर बेल्जियमच्या खेळाडूंनी अनेक चाली रचल्या; पण हंगेरीच्या बचाव फळीने त्यांची आक्रमणे परतावून लावली.  मध्यंतरासाठी खेळ थांबला तेव्हा बेल्जियमकडे १-० गोलची आघाडी होती. पुन्हा जेव्हा खेळ सुरू झाला, तेव्हा काही मिनिटे हंगेरीच्या आघाडीच्या फळीने काही चाली रचल्या; पण त्यांचा काही उपयोग झाला नाही. ७८व्या मिनिटाला बेल्जियमचा राखीव खेळाडू मिशी बातशुआईने संघाचा दुसरा गोल केला. त्यानंतर लगेचच ८० व्या मिनिटाला ईडन हजार्डने संघाचा तिसरा गोल केला. तीन गोल झाल्यानंतर हंगेरीचे खेळाडू पराभव स्वीकारल्याप्रमाणेच खेळत होते. त्यातच इंजुरी टाइममध्ये पहिल्या मिनिटाला यानिक कारस्कोने संघाचा चौथा गोल करीत आपल्या संघाचा विजय निश्चित केला. उपांत्य फेरीमध्ये जागा पक्की करण्यासाठी बेल्जियमला लिली येथे वेल्सविरुद्ध खेळावे लागणार आहे.

Web Title: Hungary defeats Belgium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.