'वेगाच्या बादशहा'चं मोठेपण; कॅन्सरग्रस्त चाहत्याला भेट दिली स्वतःची F1 कार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 05:19 PM2019-05-14T17:19:33+5:302019-05-14T17:20:09+5:30

कॅन्सरशी झगडणाऱ्या हॅरी शॉला वेगाचा बादशान लुईस हॅमिल्टन याने जगण्याचे बळ दिले...

Formula One car sent to cancer-stricken boy who inspired Lewis Hamilton's Spanish Grand Prix triumph | 'वेगाच्या बादशहा'चं मोठेपण; कॅन्सरग्रस्त चाहत्याला भेट दिली स्वतःची F1 कार

'वेगाच्या बादशहा'चं मोठेपण; कॅन्सरग्रस्त चाहत्याला भेट दिली स्वतःची F1 कार

googlenewsNext

स्पेन : कॅन्सरशी झगडणाऱ्या हॅरी शॉला वेगाचा बादशान लुईस हॅमिल्टन याने जगण्याचे बळ दिले... सरे येथील पाच वर्षीय हॅरीला कॅन्सर झाला आहे आणि तो हॅमिल्टनचा चाहता आहे. ही गोष्ट जेव्हा वेगाचा बादशाह हॅमिल्टनला समजली तेव्हा त्याने स्वतःची फॉर्म्युला वन कार हॅरीला भेट म्हणून पाठवली. बार्सिलोना ग्रां प्री शर्यतीचे जेतेपद त्याने हॅरीला समर्पित केले. हॅमिल्टनच्या या गिफ्टने हॅरीलाही जगण्याचे बळ दिले.  हॅमिल्टनने बार्सिलोना ग्रां प्री शर्यतीचा विजयी चषक आणि जागतिक अजिंक्यपद शर्यतीतील ग्लोज हॅरीला भेट म्हणून पाठवले. शिवाय हॅमिल्टनने हॅरिसाठी एक भावनिक संदेश देणारा व्हिडीओही पाठवला.

''लुईसने हॅरीसाठी शर्यत जिंकली, याचा आनंद शब्दात सांगणे कठीण आहे. आमच्या आयुष्यात किती दुःख आहे हे आम्हाला माहित. लुईसनं आमच्या मुलाप्रती दाखवलेल्या प्रेमामुळे आम्हाला जगण्याचं बळ मिळालं आहे,'' असे मत हॅरीचे वडील जेम्स यांनी व्यक्त केले. 



ते पुढे म्हणाले,''लुईस हॅमिल्टन त्याच्याबद्दल बोलतोय, यावर हॅरीला विश्वासच बसत नव्हता. लुईस आता आपला चांगला मित्र असल्याचे हॅरीला वाटत आहे. हॅरीला गाड्या आवडतात.''


 

Web Title: Formula One car sent to cancer-stricken boy who inspired Lewis Hamilton's Spanish Grand Prix triumph

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.