आॅस्ट्रेलियाचा सहज विजय

By admin | Published: September 4, 2015 10:55 PM2015-09-04T22:55:53+5:302015-09-04T22:55:53+5:30

मॅथ्यू वॅड (७१) आणि डेव्हिड वॉर्नर (५९) यांच्या अर्धशतकी खेळींनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने गुरुवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या

Easy win of Australia | आॅस्ट्रेलियाचा सहज विजय

आॅस्ट्रेलियाचा सहज विजय

Next

साऊथम्पटन : मॅथ्यू वॅड (७१) आणि डेव्हिड वॉर्नर (५९) यांच्या अर्धशतकी खेळींनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने गुरुवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या वन-डे लढतीत इंग्लंडचा ५९ धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आॅस्ट्रेलियाने ६ बाद ३०५ धावांची मजल मारली आणि प्रत्युत्तरात खेळणाऱ्या इंग्लंड संघाचा डाव ४५.३ षटकांत २४६ धावांत गुंडाळला. पाहुण्या संघातर्फे सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (५९) जो बर्न्ससोबत (४४) सलामीला ७६ धावांची तर कर्णधार स्टिव्हन स्मिथसोबत (४४) दुसऱ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. त्यानंतर आॅस्ट्रेलियाची घसरगुंडी उडाल्यामुळे आॅस्ट्रेलियाची ६ बाद १९३ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या मॅथ्यू वॅडने (नाबाद ७१) मिशेल मार्शसोबत (नाबाद ४०) सातव्या विकेटसाठी ११२ धावांची अभेद्य भागीदारी करीत संघाला ३०० चा पल्ला ओलांडून दिला. वॅडने ५० चेंडूंना सामोरे जाताना १२ चौकारांच्या सहाय्याने ७१ धावांची नाबाद खेळी केली. इंग्लंडतर्फे फिरकीपटू आदिल रशीदने ५९ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले तर मार्क वुडने एक बळी घेतला.
विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात चांगली झाली. जेसन रॉय (६७) आणि अ‍ॅलेक्स हेल्स यांनी सलामीला ७० धावांची भागीदारी केली. त्यानंतर मात्र आॅस्ट्रेलियन गोलंदाजांनी वर्चस्व गाजवत इंग्लंडचा डाव २४६ धावांत गुंडाळला. इंग्लंडतर्फे जेसन टेलर (४९) आणि कर्णधार इयान मॉर्गन (३८) यांनी उपयुक्त योगदान दिले. याव्यतिरिक्त अन्य फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. शेन वॉटसन व नॅथन कोल्टन लीन यांनी प्रत्येकी ३९ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी २ बळी घेतले. मिशेल स्टार्क व पॅट कमिन्स यांनीही प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी परतवले. मालिकेत यानंतरची लढत शनिवारी लंडनमध्ये लॉर्ड््स मैदानावर खेळल्या जाणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Easy win of Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.