रियो आॅलिम्पिकसाठी बिंद्रा पात्र

By admin | Published: May 29, 2015 01:40 AM2015-05-29T01:40:27+5:302015-05-29T01:40:27+5:30

भारताचा आघाडीचा नेमबाज अभिनव बिंद्रा याने म्युनिच येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या दहा मीटर रायफल प्रकारात सहावा क्रमांक मिळवला.

Bindra characters for Rio Olympics | रियो आॅलिम्पिकसाठी बिंद्रा पात्र

रियो आॅलिम्पिकसाठी बिंद्रा पात्र

Next

नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा नेमबाज अभिनव बिंद्रा याने म्युनिच येथे सुरु असलेल्या आयएसएसएफ नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या दहा मीटर रायफल प्रकारात सहावा क्रमांक मिळवला. यामुळे रियो येथे होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेसाठीचा कोठा
त्याने पूर्ण केला असून तो आॅलिम्पिकसाठी पात्र होणारा चौथा नेमबाज ठरला आहे.
अभिनव बिंद्राच्या अगोदर भारताच्या गगण नारंग, जीतू राय आणि अपूर्वी चंदेला यांनी आॅलिम्पिकसाठीच्या पात्रतेचा कोठा पूर्ण केला आहे. नारंगने महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेतील फोर्ट बेनिंग येथे विश्वकप ५० मीटर एअर
रायफल स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवला होता. चंदेलाने कोरिया
येथे झालेल्या विश्वकप दहा मीटर एअर रायफल स्पर्धेत कास्यपदक पटकावले होते. तसेच जीतू रायने मागीलवर्षी स्पेनमधील ग्रेनाडा विश्वचषक स्पर्धेत ५० मीटर एअर पिस्टल स्पर्धेत रौप्यपदक पटकावून आॅलिम्पिकचा कोटा पूर्ण केला
होता. (वृत्तसंस्था)

Web Title: Bindra characters for Rio Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.