Asian Games 2018: बजरंगाची कमाल.. विजयासह उपांत्यपूर्व फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 02:26 PM2018-08-19T14:26:33+5:302018-08-19T14:27:35+5:30

आपल्या चतुर आणि आक्रमक खेळाने बजरंगने पहिल्या लढतीत विजय मिळवला. या विजयासह त्याला उपांत्यपूर्व लढतीचे दरवाजे खुले झाले आहेत.

Asian Games 2018: Bajrang punia enters in quarterfinals | Asian Games 2018: बजरंगाची कमाल.. विजयासह उपांत्यपूर्व फेरीत

Asian Games 2018: बजरंगाची कमाल.. विजयासह उपांत्यपूर्व फेरीत

Next
ठळक मुद्देपहिल्याच लढतीत बजरंगने 65 किलो वजनीगटात विजय मिळवत थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

जकार्ता : भारताचा मल्ल बजरंग पुनियाने 65 किलो वजनी गटामध्ये आशिया क्रीडा स्पर्धेत दमदार सुरुवात केली आहे. पहिल्याच लढतीत बजरंगने 65 किलो वजनीगटात विजय मिळवत थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.


बजरंगने पहिल्याच लढतीत सुंदर खेळ केला. खेळातील तांत्रिक गोष्टी त्याने घोटवून घेतल्या होत्या आणि तेच या सामन्यात पाहायला मिळाले. आपल्या चतुर आणि आक्रमक खेळाने बजरंगने पहिल्या लढतीत विजय मिळवला. या विजयासह त्याला उपांत्यपूर्व लढतीचे दरवाजे खुले झाले आहेत.


Web Title: Asian Games 2018: Bajrang punia enters in quarterfinals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.