आशियाई स्पर्धेत भारताच्या 524 खेळाडूंचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2018 14:40 IST2018-07-03T14:40:14+5:302018-07-03T14:40:22+5:30

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने 524 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.

524 Indian players in Asian Games | आशियाई स्पर्धेत भारताच्या 524 खेळाडूंचा समावेश

आशियाई स्पर्धेत भारताच्या 524 खेळाडूंचा समावेश

नवी दिल्ली : जकर्ता येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने 524 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीत 277 पुरुष आणि 247 महिला खेळाडूंचा सहभाग आहे. ही स्पर्धा 18 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत रंगणार आहे.
यंदाच्या आशियाई स्पर्धेत 36 खेळांचा समावेश करण्यात आला आहे, यामध्ये आठ खेळ नव्याने दिसणार आहेत. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव राजीव मेहता यांनी सांगितले की," आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा. दूरदृष्टी ठेवूनच या खेळाडूंची निवड या स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. या स्पर्धेचा खेळाडूंना 2020 साली टोकीयो येथे होणाऱ्या ऑलिंपिकसाठी नक्कीच फायदा होइल.

Web Title: 524 Indian players in Asian Games