बोनसरीत भंगार गोदामांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 02:36 AM2017-12-27T02:36:07+5:302017-12-27T02:36:11+5:30

नवी मुंबई : एमआयडीसी क्षेत्रात भंगारमाफियांनी हैदोस घातला आहे. बंद पडलेल्या कारखान्यांच्या जागांवर बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून भंगारविक्रेत्यांनी आपली गोदामे थाटली आहेत.

Warehouse warehouses | बोनसरीत भंगार गोदामांचा सुळसुळाट

बोनसरीत भंगार गोदामांचा सुळसुळाट

Next

नवी मुंबई : एमआयडीसी क्षेत्रात भंगारमाफियांनी हैदोस घातला आहे. बंद पडलेल्या कारखान्यांच्या जागांवर बेकायदेशीररीत्या अतिक्रमण करून भंगारविक्रेत्यांनी आपली गोदामे थाटली आहेत. तुर्भे येथील बोनसरी गावात अशाच प्रकारे तीन ते चार भंगारविक्रेत्यांनी एक बंद पडलेल्या कारखान्याच्या जागेवर गोदामे थाटली आहेत. त्यामुळे परिसरात वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. तसेच भुरट्या चोºयांत वाढ झाल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत.
अशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून टीटीसी क्षेत्राची ओळख आहे. सुमारे २५ कि.मी. क्षेत्रफळावर विस्तारलेल्या या औद्योगिक वसाहतीच्या नियोजनात एमआयडीसी प्रशासनाला पुरते अपयश आले आहे. मागील दीड-दोन दशकांत विविध कारणांमुळे या क्षेत्रातील उद्योगांना घरघर लागली आहे. अनेक कंपन्या बंद पडल्या आहेत. तर काहींनी इतर टाळेबंदी जाहीर करून इतर राज्यांत स्थलांतरण केले आहे. बंद पडलेल्या या कारखान्यांतील यंत्र व इतर लोखंडी साहित्यावर भंगारमाफियांनी डल्ला मारायला सुरुवात केली आहे. याचा परिणाम या संपूर्ण परिसरात रात्रीच्या वेळी भंगारचोरांचा बोलबाला असतो. स्थानिक पुढारी आणि पोलिसांना हाताशी धरून बिनदिक्कतपणे भंगाराची दुकाने उभारली जात आहेत. तुर्भे येथील बोनसरी गावाजवळ बंद पडलेल्या एका कंपनीच्या प्रशस्त जागेवर मागील तीन महिन्यांपासून भंगारविक्रेत्यांनी आपली गोदामे थाटली आहेत. विशेष म्हणजे, या गोदामांना अधिकृत वीज व पाणीपुरवठा नाही. त्यामुळे संबंधितांकडून वीज व पाण्याची चोरी होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. या बेकायदा गोदामामुळे परिसरात नागरी समस्या निर्माण झाल्या आहेत. रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अवजड वाहनांमुळे सिमेंटच्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या प्रकाराकडे एमआयडीसी प्रशासनाकडून ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचा स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे.
बोनसरी प्रमाणेच एमआयडीसीच्या प्रत्यक्ष क्षेत्रात भंगारविक्रेत्यांचा सुळसुळाट झाला आहे. रात्रीच्या अंधारात बंद पडलेल्या कारखान्यातील सुरक्षारक्षकांना धमकावून लोखंडी साहित्य, केमिकल्सचे ड्रम व इतर सामग्रीची चोरी केली जाते. या भंगारचोरीच्या मागे या क्षेत्रात बेकायदेशीरपणे उभारलेल्या गोदामचालकांचाच हात असल्याचे याअगोदर अनेकदा स्पष्ट झाले आहे. ही वस्तुस्थिती असतानाही या बेकायदेशीर व्यवसायाला नक्की कोणाचे पाठबळ मिळते? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
>कारखानदारांची डोकदुखी
विविध कारणांमुळे एमआयडीसीतील शेकडो कंपन्या बंद पडल्या आहेत. या बंद पडलेल्यांपैकी अनेक कंपन्यांच्या परिसरातील मोकळ्या जागांवर भंगाराची गोदामे, हॉटेल्स व गॅरेजेस थाटली आहेत. या अतिक्रमणाला स्थानिक पुढारी, एमआयडीसीचे अधिकारी व स्थानिक पोलिसांचे अप्रत्यक्ष अभय आहे. त्यामुळे आपल्या कारखान्याची अतिक्रमित जागा परत मिळविताना कारखानदारांची कसरत होत आहे. भंगारविक्रेत्यांशी दोन हात करण्याऐवजी अनेकांनी न्यायालयाचा आधार घेतला आहे. या माध्यमातून न्याय मिळण्यास विलंब होत असल्याने कारखानदारांची डोकेदुखी वाढली आहे.

Web Title: Warehouse warehouses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.