नियमबाह्य भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम, पनवेल महापालिकेचे पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 04:39 AM2019-02-04T04:39:36+5:302019-02-04T04:39:50+5:30

बाह्ययंत्रणेद्वारे पालिकेत भरती करण्यात आलेल्या कर्मचाºयांना चारित्र्य पडताळणी सादर करण्यासाठी पालिकेने २९ जानेवारी रोजी पत्रक काढले आहे

Ultimatum, Panvel Municipal letter letter to the employees recruited | नियमबाह्य भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम, पनवेल महापालिकेचे पत्र

नियमबाह्य भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम, पनवेल महापालिकेचे पत्र

Next

- वैभव गायकर

पनवेल - बाह्ययंत्रणेद्वारे पालिकेत भरती करण्यात आलेल्या कर्मचाºयांना चारित्र्य पडताळणी सादर करण्यासाठी पालिकेने २९ जानेवारी रोजी पत्रक काढले आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत आस्थापना विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना आपले चारित्र्य पडताळणी दाखले सादर करण्याच्या सूचना पालिका उपायुक्तांनी केल्या आहेत. यामुळे नियमबाह्य भरती करण्यात आलेल्या कर्मचाºयांना घरचा रस्ता धरावा लागणार आहे.

नगरपरिषद अस्तित्वात असताना पालिकेत मोठ्या प्रमाणात नियमबाह्य भरती करण्यात आल्याचे बोलले जात आहे. अनेकांचे जात पडताळणी दाखले या वेळी घेण्यात आले नव्हते. मात्र, महापालिकेला दोन वर्षांनंतर जाग आली असून, कर्मचाºयांना जात पडताळणी दाखले सादर करण्यास अल्टिमेटम दिला आहे. या व्यतिरिक्त वाहनचालक व डाटा एंट्री आॅपरेटर्सची नव्याने चाचणीदेखील घेतली जाणार आहे. यामध्ये डाटा एंट्री आॅपरेटर्सची स्पीड टेस्ट संगणकावर केली जाणार आहे. या चाचणीत अनुत्तीर्ण झालेल्या कर्मचाºयांची सेवा समाप्त करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात येणार आहेत. अशा डाटा एंट्री आॅपरेटर्सना १५ फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदत देण्यात येणार आहे.

पालिकेत आस्थापना विभागात २२५ कर्मचारी बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यात आलेले आहेत. यामध्ये शिपाई, डाटा एंट्री आॅपरेटर्स, वाहनचालक, फायरमन, बहुउद्देशीय कामगारांचा समावेश आहे.

३२० कर्मचा-यांची चारित्र्य पडताळणी नाही
पनवेल महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २३ ग्रामपंचायतींमधील ३२० कर्मचाºयांचा नुकताच पालिकेत समावेश करण्याचा निर्णय कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीने घेतला आहे. मात्र, दोन वर्षे उलटून पालिकेची सेवा बजावत असलेल्या या कर्मचाºयांची चारित्र्य पडताळणी पालिकेने केलेली नाही.

शासकीय कार्यालयात नोकरभरती करीत असता, सर्वप्रथम संबंधित कर्मचाºयाचा चारित्र्य पडताळणी दाखला बघितला जातो. त्यानंतरच कर्मचाºयांना भरती केले जाते. मात्र, पनवेल महापालिकेत कर्मचारी अनेक वर्षांपासून पालिकेत कार्यरत असतानादेखील अद्याप चारित्र्य पडताळणी दाखला सादर केलेला नाही.

चारित्र्य पडताळणी दाखला सादर करण्यासाठी परिपत्रक काढलेले आहे. नियमबाह्य भरतीवर यामुळे आवर बसणार आहे. डाटा एंट्री आॅपरेटर्स तसेच वाहनचालकांचीही पालिका चाचणी घेणार आहे.
- जमीर लेंगरेकर, उपायुक्त,
पनवेल महानगरपालिका

Web Title: Ultimatum, Panvel Municipal letter letter to the employees recruited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.