अतिक्रमण विभागातील कर्मचारी हिम्मत वाघेला यांचे निलंबन 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 08:32 PM2019-07-11T20:32:38+5:302019-07-11T20:32:43+5:30

पनवेल महानगर पालिकेत ड प्रभागात अतिक्रमण विभागात कार्यरत असलेल्या हिम्मत वाघेला या कर्मचाऱ्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी गुरुवारी निलंबन केले.

Suspension of Himmat Vaghela employee of encroachment division | अतिक्रमण विभागातील कर्मचारी हिम्मत वाघेला यांचे निलंबन 

अतिक्रमण विभागातील कर्मचारी हिम्मत वाघेला यांचे निलंबन 

Next

पनवेल : पनवेल महानगर पालिकेत ड प्रभागात अतिक्रमण विभागात कार्यरत असलेल्या हिम्मत वाघेला या कर्मचाऱ्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी गुरुवारी निलंबन केले. बेजबाबदार वागणूक व भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी कृती केल्यामुळे हे निलंबन करण्यात आले आहे.

हिम्मत वाघेला हे कारवाईच्या धाडी टाकण्यापूर्वी संबंधित फेरीवाल्यांना माहिती देत असत, तक्रारी प्राप्त होऊन देखील अनधिकृत बॅनर न हटविणे आदींसह अधिकार नसताना दुसऱ्या प्रभागात जाऊन अतिक्रमण केलेल्या वस्तू नोंद न करता घेऊन अशा प्रकारचा ठपका वाघेला यांच्यावर ठेवून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

Web Title: Suspension of Himmat Vaghela employee of encroachment division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.