रबाळेतील फरसाणच्या कारखान्यावर छापा, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 12:12 AM2019-07-17T00:12:38+5:302019-07-17T00:12:46+5:30

टाकाऊ खाद्यतेलाचा वापर करून फरसाण तळणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून कारवाई केली आहे.

Procurement of rabbit fencing factory, food and drug administration action | रबाळेतील फरसाणच्या कारखान्यावर छापा, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

रबाळेतील फरसाणच्या कारखान्यावर छापा, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Next

नवी मुंबई : टाकाऊ खाद्यतेलाचा वापर करून फरसाण तळणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून कारवाई केली आहे. रबाळे नाका येथे हा कारखाना चालवला जात होता. हॉटेल्समध्ये वापरलेले काळे खाद्यतेल कमी भावाने खरेदी करून ते फरसाण तळण्यासाठी वापरले जात होते.
रबाळे नाका येथे कोणत्याही व्यवसाय परवान्याशिवाय हा कारखाना चालवला जात होता. त्याठिकाणी शहरातील हॉटेल्समध्ये वापरण्यात आलेले खाद्यतेल फरसाण तळण्यासाठी वापरले जात होते. अशा प्रकारे हॉटेल्समधून निघणारे तेल जमा करून ते सदर कारखान्याला पुरवले जात असल्याची बाब नयन म्हात्रे यांच्या निदर्शनास आली होती. यामुळे त्यांनी ठिकठिकाणच्या हॉटेलमधून तेल जमा करणाºया वाहनाचा पाठलाग केला असता या कारखान्याची माहिती समोर आली. यानुसार त्यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन अधिकारी अरविंद कोंडीलकर यांच्या पथकाने सोमवारी त्याठिकाणी छापा टाकला. यावेळी सदर फरसाण कारखान्याकडे व्यवसाय परवाना देखील नसल्याचे उघड झाले. यानुसार त्याला व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच तिथल्या तेलाचे तीन नमुने घेवून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या तेलाच्या अहवालानंतर संबंधितावर योग्य कारवाई केली जाणार असल्याचेही कोंडीलकर यांनी सांगितले. सदर कारखान्यात वापरास अयोग्य असलेल्या खाद्यतेलापासून फरसाण तळले जायचे. तेच फरसाण शहरातील अनेक ठिकाणच्या व्यावसायिकांना विक्रीसाठी दिले जात होते.
मात्र या प्रकारामुळे शहरात टाकाऊ खाद्यतेलाचा पुनर्वापर करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. हॉटेल्समधून निघणारे टाकाऊ खाद्यतेल जमा करून त्यापासून बायोडिझेल बनवण्याची शासनाची संकल्पना आहे. त्यानुसार हॉटेल्समध्ये वापरलेले खाद्यतेल जमा करून ते संबंधित संस्थेकडे पुरवण्याचे काम काही संघटनांना देण्यात आले आहे. मात्र हॉटेल व्यावसायिकांकडून टाकाऊ तेलातून देखील नफा मिळवण्यासाठी अशा अवैध कारखान्यांना पुरवले जात असल्याचे या प्रकरणातून उघड झाले आहे.

Web Title: Procurement of rabbit fencing factory, food and drug administration action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.