प्रकल्पग्रस्त पालिकेवर धडकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 07:10 AM2017-10-16T07:10:11+5:302017-10-16T07:10:44+5:30

सावली गावातील अधिकृत घरे तोडल्यामुळे नवी मुंबईमधील भूमिपुत्रांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी प्रकल्पग्रस्त नागरिक सोमवारी मनपा मुख्यालयावर धडक देणार आहेत.

 The PAPs will be hit by the corporation | प्रकल्पग्रस्त पालिकेवर धडकणार

प्रकल्पग्रस्त पालिकेवर धडकणार

Next

 नवी मुंबई : सावली गावातील अधिकृत घरे तोडल्यामुळे नवी मुंबईमधील भूमिपुत्रांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी प्रकल्पग्रस्त नागरिक सोमवारी मनपा मुख्यालयावर धडक देणार आहेत. सर्वसाधारण सभेमध्ये आवाज उठविण्याचे आवाहन सर्व नगरसेवकांना करण्यात आले आहे.
सिडकोने यापूर्वी केलेल्या कारवाईमुळे सावली गाव नवी मुंबईच्या नकाशावर फक्त नावापुरते शिल्लक राहिले आहे. गावामध्ये रेवनाथ शंकर पाटील व अनंत पाटील, नरेश पाटील व रवी पाटील या चौघांचे ग्रामपंचायत काळातील घर होते. घर अधिकृत असल्याचे पुरावे असतानाही महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हे घर नुकतेच पाडले असून गावातील जुने मंदिरही हटविण्यात आले आहे. सावली गावातील अतिक्रमण कारवाईचा भूमिपुत्रांनी निषेध केला आहे. आगरी कोळी युथ फाउंडेशनने १२ आॅक्टोबरला निषेध सभेचे आयोजन केले होते. ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. फाउंडेशनच्या वतीने या विषयाचे आकलन करताना सावली गावाबाबत अनेक पातळीवर सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिकेकडून प्रशासकीय आणि तांत्रिक चुका झाल्याचे लक्षात आले आहे. यामुळे ग्रामस्थांना न्याय मिळाला पाहिजे. याशिवाय ग्रामस्थांचे आर्थिक नुकसान करून मानसिक त्रास देणाºया अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. प्रकल्पग्रस्तांवर अन्याय दूर करावा या मागणीचे निवेदन महापालिका व पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व दोषी असणाºया अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी या निवेदनामध्ये केली आहे.
महापालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी होणार आहे. या सभेमध्ये सावली गावच्या विषयावर आवाज उठविण्यात यावा, असे आवाहन सर्व नगरसेवकांना करण्यात आले आहे. ग्रामस्थांवर झालेल्या अन्यायाला सभागृहात वाचा फोडण्यात यावी. अतिक्रमण विभागाने चुकीच्या पद्धतीने कारवाई केली आहे. दोषींवर कारवाईची मागणी लावून धरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय प्रकल्पग्रस्त नागरिक कारवाईच्या मागणीसाठी महापालिका मुख्यालयावर धडक देवून जाब विचारणार आहेत. यामुळे सोमवारची सर्वसाधारण सभा वादळी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. किती प्रकल्पग्रस्त नागरिक मुख्यालयावर धडक देणार याविषयी काहीही अंदाज व्यक्त केला जात नाही. याशिवाय नगरसेवक नक्की काय भूमिका घेणार हेही सभा सुरू झाल्यानंतरच
स्पष्ट होणार आहे. यामुळे शहरवासीयांचे लक्ष सर्वसाधारण सभेकडे लागले आहे.
 


सोमवारी होणारी सर्वसाधारण सभा वादळी होण्याची शक्यता आहे. प्रकल्पग्रस्त
नगरसेवक सावली गावच्या मुद्द्यावरून प्रशासनाला घेरणार आहेत. ंयाशिवाय प्रकल्पग्रस्त नागरिकही निषेध करण्यासाठी मुख्यालयावर धडक देणार आहेत.
याविषयी माहिती पोलीस प्रशासनापर्यंत पोहचली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा
प्रश्न निर्माण होवू नये यासाठी महापालिका सभागृह व मुख्यालयाबाहेर बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात येणार आहे.

Web Title:  The PAPs will be hit by the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Homeघर