पनवेलकरांची ‘कचरा’कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 01:04 AM2018-03-29T01:04:59+5:302018-03-29T01:04:59+5:30

महापालिका घनकचरा व्यवस्थापनाच्या हस्तांतरणासाठी चालढकल करत असल्याने सिडकोने २८ मार्चपासून कचरा उचलणे थांबविले आहे.

Panvelkar's 'garbage' | पनवेलकरांची ‘कचरा’कोंडी

पनवेलकरांची ‘कचरा’कोंडी

Next

वैभव गायकर 
पनवेल : महापालिका घनकचरा व्यवस्थापनाच्या हस्तांतरणासाठी चालढकल करत असल्याने सिडकोने २८ मार्चपासून कचरा उचलणे थांबविले आहे. महापालिका क्षेत्रामध्ये सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले असून, तीव्र दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राज्यातील श्रीमंत महामंडळ असलेली सिडको आरोग्याशी खेळू लागल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजे, नवीन पनवेल या सर्वच ठिकाणी कचºयाचे ढीगच्या ढीग साचलेले पाहावयास मिळत आहेत. कचºयाच्या ढिगाºयामुळे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानानिमित्त शहरातील भिंती रंगविणाºया महापालिकेला घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सोडविण्यात अपयश आले आहे. सिडकोकडून कचरा हस्तांतर करून घेण्यासाठीच्या तारखा चार वेळा जाहीर केल्या; परंतु प्रत्यक्षात हस्तांतर करून घेण्यात आले नाही. महापालिकेकडे तेवढी यंत्रणा नसल्याने हस्तांतरण टाळले जात आहे. या प्रश्नाची दखल शासनाने घेऊन नुकतेच एक परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार पालिका क्षेत्रातील सिडको नोडमधील पायाभूत सुविधांची जबाबदारी सिडकोकडेच असणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सिडको नोड हस्तांतरणासाठी शासनाने त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त या समितीत असणार आहेत.
नगरविकास विभागाचे उपसचिव शंकर जाधव यांनी २३ मार्चला काढलेल्या परिपत्रकानंतर सिडकोने शहरातील कचरा उचलण्यास सुरु वात केली होती. मात्र, बुधवारी अचानकपणे सिडकोने कचरा उचलण्यास बंद केल्याने नागरिकदेखील संभ्रमात आहेत. शासनाच्या दोन संस्थांमधील समन्वयाचा आभाव नागरिकांच्या आरोग्याला मारक ठरताना दिसून येत आहे. शेकडो टन कचरा रस्त्यावर पडलेला दिसून येत आहे. कचराकुंड्याही ओसंडून वाहत आहेत. पालिकेच्या स्थापनेनंतर कचराप्रश्न आणखीनच बिकट झालेला आहे. यापूर्वी सफाई कामगारांच्या कामबंद आंदोलनामुळे शहरात कचरा साचण्याचा प्रकार वारंवार पाहावयास मिळत होता. मात्र, सिडको नोड हस्तांतरणाच्या प्रक्रि येत वारंवार कचरासमस्या निर्माण होत आहे. सिडको कचरा हस्तांतरणाचा प्रस्ताव शासनाकडे यापूर्वीच पाठविलेला आहे. पालिकेच्या विनंतीवरून सहा वेळा सिडकोने कचरा हस्तांतरणाला स्थगिती दिली. यानंतरही पनवेल महानगरपालिकेच्या मार्फत विविध कारणे दाखवून कचरा उचलण्यास टाळाटाळ केल्यानंतरच सिडकोने कचरा उचलण्यास बुधवारपासून बंद केले. कचरा हस्तांतरणाचा निर्णय झाल्यानंतर शासनाने परिपत्रक काढले; पण हस्तांतरणाचा निर्णय यापूर्वीच झाला असल्याची सिडकोची भूमिका असून, पायाभूत सुविधा हस्तांतरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीविषयी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांना कोणतीच कल्पना नव्हती, असे सांगितले जात आहे.

पालिका क्षेत्रातील सिडको नोडमध्ये पायाभूत सुविधा पुरविणे सिडकोची जबाबदारी असल्याचे पत्रक शासनाने काढले आहे. असे असतानादेखील सिडको कचरा उचलत नसेल, तर हा शासनाचा अवमान आहे. सध्याच्या घडीला उद्भवलेल्या परिस्थितीला पूर्णपणे सिडकोच जबाबदार असून, त्यांनी कचरा उचलणे बंधनकारक आहे.
- संध्या बावनकुळे, उपायुक्त, पनवेल महापालिकाकचरा उचलण्यास बंद करणे, याचे कारण काय? सिडको असो वा पालिका नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. समन्वयाच्या अभावामुळे वारंवार ही समस्या उद्भवत असेल, तर खुद्द मुख्यमंत्र्यांनी दोन्ही प्रशासनाला ताकीद देणे गरजेचे आहे.
- अभिमन्यू तोडेकर, खारघरपालिका प्रशासनाला वारंवार सांगूनदेखील पालिका प्रशासन कचरा हस्तांतरणाला तयार नाही. सिडको ने पालिकेशी केलेल्या पत्रव्यवहाराप्रमाणे कचरा उचलण्यास बंद केले आहे. आयुक्तांच्या हेकेखोरपणामुळे आज सर्वत्र कचराच कचरा साचलेला आहे. या गोष्टीला सर्वस्वी आयुक्त जबाबदार आहेत.
- परेश ठाकूर,
सभागृहनेते, पनवेल महापालिकाशहरात उद्भवणाºया कचराप्रश्नी सिडकोला निवेदन दिले होते. यानंतर सिडकोने पुन्हा कचरा उचलण्यास बंद केले आहे. या समस्येवर लवकरात लवकर तोडगा न काढल्यास आम्ही सिडकोवर धडक मोर्चा काढू.
- गुरु नाथ पाटील
शिवसेना शहरप्रमुख, खारघरकचरा हस्तांतरणासंदर्भात पालिकेने १५ मार्चपर्यंत सिडकोकडे मुदतवाढ मागितली होती. त्यानंतर मुदतवाढ देऊनही पालिका कचरा उचलत नसल्याने सिडकोने कचरा उचलण्याचे काम थांबविले आहे.
- मोहन निनावे,
जनसंपर्क अधिकारी,
सिडको

Web Title: Panvelkar's 'garbage'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.