पनवेल महानगरपालिका आयुक्तांना जिवे मारण्याची धमकी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 06:16 AM2017-12-01T06:16:47+5:302017-12-01T06:17:08+5:30

पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी निनावी पत्राद्वारे देण्यात आली आहे. आयुक्त शिंदे हे शासनाच्या शिष्टमंडळासाठी चीनला गेले असताना टपालाद्वारे हे गोपनीय पत्र पनवेल महानगरपालिकेला पाठविण्यात आले आहे.

 Panvel threatens to kill municipal commissioner | पनवेल महानगरपालिका आयुक्तांना जिवे मारण्याची धमकी  

पनवेल महानगरपालिका आयुक्तांना जिवे मारण्याची धमकी  

googlenewsNext

पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी निनावी पत्राद्वारे देण्यात आली आहे. आयुक्त शिंदे हे शासनाच्या शिष्टमंडळासाठी चीनला गेले असताना टपालाद्वारे हे गोपनीय पत्र पनवेल महानगरपालिकेला पाठविण्यात आले आहे. यासंदर्भात आयुक्त शिंदे यांनी गुरु वारी पालिका मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
तुम्ही मग्रुरीने पालिकेचा कारभार हाकत आहात, हे कुठेतरी थांबायला हवे आहे. अनेक वेळा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भेटून तुम्हाला याबाबत कल्पना देऊनही तुमच्या वागण्यात काहीच फरक पडलेला नसल्याने तुम्हाला संपविण्याशिवाय आम्हाला दुसरा पर्याय उरलेला नाही. तुम्ही वारंवार नगरसेवकांच्या अधिकारांवर घाला घालत आहात. तुम्ही असेच वागलात तर मी तुमच्या चेहºयावर काळे फासेन, तुमच्या चारित्र्यावर डाग लावीन. आम्ही तशी फिल्डिंग मंत्रालयातून लावलेली आहे. व्यवस्थित वागल्यास आम्ही हे सर्व थांबवू, अशी धमकी पत्रात आहे. तुम्ही ज्या नागरिकांना खूश करण्यासाठी हे सर्व पारदर्शक कारभार करता त्यांना मतदानावेळी आम्ही तीन हजार रुपये देऊन नगरसेवक म्हणून निवडून आलो. तुमच्यावर अ‍ॅट्रॉसिटी दाखल करू. आमच्या मर्जीतील कंत्राटदार पालिकेत नेमा, त्याला दरमहा आम्हाला भेटायला सांगा, तुम्ही पैसे खात नाही; पण आम्हाला लागतात, असेही पत्रात नमूद आहे.
तुमच्यामुळेच हे अधिकारी नगरसेवकांशी मग्रुरीने वागत आहेत. स्वत:ला मुख्यमंत्री असल्याचे समजत आहेत. पालिकेतील उपायुक्त संध्या बावनकुळे व जमीर लेंगरेकर यांचाही उल्लेख पत्रात आहे. आयुक्त शिंदे यांनी पत्र सोमवारी प्राप्त झाल्याचे सांगितले. मी वैयक्तिक काम करीत नसून, जनतेचीच कामे करीत आहे. या पत्राला न घाबरता मी अजून जोमाने कामाला लागेन, असे शिंदे म्हणाले.

भाजपा नगरसेवक, आयुक्त शिंदे यांच्यात वाद

मागील अनेक दिवसांपासून पनवेल महानगरपालिकेत सत्ताधारी भाजपा नगरसेवक व आयुक्त शिंदे यांच्यात वाद पेटला आहे. आयुक्त मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप सत्ताधारी नगरसेवक खुलेआम करीत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पालिकेच्या महासभेत आयुक्तांविरोधात अ‍ॅट्रॉसिटी, अविश्वास ठराव आणण्यासंदर्भात उघडपणे चर्चा करण्यात आली होती. त्यामुळे पत्र पाठवणाºयांनी मुद्दामहून अनेक गोष्टी या पत्रात नमूद केल्या आहेत. यासंदर्भात नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्र ार केली आहे. २३ नोव्हेंबरला हे पत्र पनवेल महानगरपालिकेला प्राप्त झाले आहे.

Web Title:  Panvel threatens to kill municipal commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.