वाशीत रंगणार ‘ठसका लावणीचा’, लावणी स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 01:32 AM2017-12-06T01:32:34+5:302017-12-06T01:33:28+5:30

लोकमत सखी मंच आणि कल्पतरू महिला मंडळ, वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, ८ डिसेंबर रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे दुपारी ३.३० वाजता ‘ठसका लावणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

Organizing 'Lavni Chhas', 'Chaska Lavani', will be organized in Vashi | वाशीत रंगणार ‘ठसका लावणीचा’, लावणी स्पर्धेचे आयोजन

वाशीत रंगणार ‘ठसका लावणीचा’, लावणी स्पर्धेचे आयोजन

googlenewsNext

नवी मुंबई : लोकमत सखी मंच आणि कल्पतरू महिला मंडळ, वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, ८ डिसेंबर रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे दुपारी ३.३० वाजता ‘ठसका लावणीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी आयोजित कार्यक्रमात समूह लावणी नृत्य स्पर्धा होणार आहे. खास महिलांसाठी आयोजित या कार्यक्रमात ‘लोकमत सखी मंच’ व्यासपीठाच्या महिला सभासदांना सहभागी होता येणार आहे.
‘लोकमत’च्या सर्व महिला वाचकांना हा कार्यक्रम पाहण्याची संधी मिळणार आहे. खास महिलांसाठी लावणीचे सादरीकरण केले जाणार आहे. यामध्ये पारंपरिक लावणीबरोबरच फ्युजन लावणी देखील सादर करण्याची संधी सखींना मिळणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन लोकमत सखी मंचच्या वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच उत्तेजनार्थ लावणी ग्रुपला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धेचे नियम व अटी
नावनोंदणी आवश्यक
एका ग्रुपमध्ये ८ ते १० जणी असाव्यात
नृत्य सादरीकरणासाठी ७ मिनिटे वेळ दिली जाईल
परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
अधिक माहितीसाठी संपर्क : ७०४५८८५०६४

Web Title: Organizing 'Lavni Chhas', 'Chaska Lavani', will be organized in Vashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.