गुटखा विक्रीचे रॅकेट उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 04:31 AM2018-10-28T04:31:52+5:302018-10-28T04:32:17+5:30

पाच जणांविरोधात गुन्हा; बाजार समितीत पोलिसांसह एफडीएची कारवाई

Open the gutkha sale rackets | गुटखा विक्रीचे रॅकेट उघड

गुटखा विक्रीचे रॅकेट उघड

Next

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुटखा विक्रीचे रॅकेट उघडकीस आले आहे. अमली पदार्थ विरोधी पथक, एपीएमसी पोलीस स्टेशनसह अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, ४२५८० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये मुस्ताक मोहम्मद अन्वार, राजन कुमार गौरीशंकर गुप्ता, धर्मेंद्र जगदीश शहा, मोहन गोपाळ पाल व प्रमोद कुमार आर्य अशी त्यांची नावे आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाने पानटपऱ्यांवर धाड टाकून राजश्री पानमसाल्याच्या ३०० पुड्या, एसएचके पान मसाल्याच्या ३३० पुड्या, विमलच्या १२००, सुधा प्लस पानमसाला ६५० पुड्या हस्तगत केल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी योगेश ढाणे यांनी संबंधितांविरोधात एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. राज्य शासनाने गुटखा बंदी केल्यानंतरही मुंबई बाजार समितीमध्ये बिनधास्तपणे गुटखा विक्री केली जात होती. पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला राजन उर्फ मुन्ना गुप्ता व त्याचा भाऊ राकेश हे दोघे पानटपºयांना गुटखा पुरवत असल्याचे बाजार समितीमधील अधिकारी व कर्मचारी खासगीमध्ये बोलत होते. गुप्ता बंधूंनी मार्केटमध्ये अनेक पानटपºया चालविण्यासाठी घेतल्या असल्याचेही बोलले जात होते. गुटख्याची बिनधास्त विक्री सुरू असूनही प्रशासन काहीही कारवाई करत नव्हते. येथील गुटखा विक्रीविषयी ‘लोकमत’ने वारंवार आवाज उठविला होता. स्टिंग आॅपरेशन करून गुटखा विक्रीचे वास्तव निदर्शनास आणून दिले होते. यानंतर सुरक्षारक्षकांनी काही पानटपरी चालकांवर कारवाई करून गुटखा जप्त केला होता; परंतु नंतर पुन्हा संबंधितांना विक्रीसाठी छुपा पाठिंबा दिला होता.
बाजार समितीमध्ये व्यापारी, कामगार, शेतकरी व इतर घटकांना अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करता यावा, यासाठी छोटे स्टॉल्स उपलब्ध करून दिले आहेत; परंतु बहुतांश स्टॉल्समध्ये गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक स्टॉल्स मूळ मालकांनी इतरांना भाडेतत्त्वावर दिले आहेत.
एका वर्षापूर्वी टपºयांमध्ये गांजाही विकला जात होता. याविषयी आवाज उठविल्यानंतर गांजाची खुलेआम विक्री थांबली आहे; परंतु अद्याप अनेक जण चोरून गांजा विक्रीचा व्यवसाय करत आहेत. मार्केटमध्ये गुटखा कोण आणतो, याची पूर्ण माहिती प्रशासनाला आहे. यानंतरही संबंधितांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात होते. अखेर अमली पदार्थ विरोधी पथक, एपीएमसी पोलीस स्टेशन, अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर येथील रॅकेट उघडकीस आले आहे. बाजार समिती प्रशासन काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Open the gutkha sale rackets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.