जिल्ह्यात निर्मळ सागर तट अभियान

By Admin | Published: September 17, 2016 02:14 AM2016-09-17T02:14:37+5:302016-09-17T02:14:37+5:30

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील सहा समुद्र किनाऱ्यांसहित महाराष्ट्रातील ६५ समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता केली जाणार

Nirmal Sagar coast campaign in the district | जिल्ह्यात निर्मळ सागर तट अभियान

जिल्ह्यात निर्मळ सागर तट अभियान

googlenewsNext

बोर्ली-मांडला/ मुरुड : महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील सहा समुद्र किनाऱ्यांसहित महाराष्ट्रातील ६५ समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता केली जाणार असून या अभियानाचा शुभारंभ शनिवारी १७ सप्टेंबर रोजी वर्सोवा येथे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
१७ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर २०१६ पर्यंत निर्मळ सागर पंधरवडा साजरा करण्यात येत असून यामध्ये सर्वोत्कृष्ट किनारपट्टीला रु पये २५ लाखांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. निर्मळ सागर अभियानात रायगड जिल्ह्यातील अलिबाग, काशिद, मुरु ड, श्रीवर्धन, रेवदंडा, दिवेआगर आदी सहा समुद्र किनाऱ्यांचा समावेश आहे. या अभियानात समुद्रकिनाऱ्यांचे संरक्षण, संवर्धन व्यवस्थापन, किनारपट्टी संरक्षणाबाबत जनजागृती, जलक्र ीडा व्यवस्थापन, पर्यटनास प्रोत्साहन देणे व वृद्धिंगत करणे, पर्यावरण संवर्धक म्हणून बायोगॅस, सौर, वायू ऊर्जा या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांना प्रोत्साहन देणे, किनाऱ्यावर सतर्कता राखून जीवरक्षकांमार्फत बुडण्याचे प्रसंग टाळणे, कोणी बुडाल्यास बचाव आणि मदतकार्य कारणे आदी प्रकारची प्रात्यक्षिके होणार आहेत. समुद्र किनारा स्वच्छ व सुंदर ठेवून पर्यटनवाढीस चालना देण्याचे प्रयत्न या अभियानामार्फत करण्यात येणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Nirmal Sagar coast campaign in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.