राष्ट्रवादीचे आंदोलन फेल, सुट्टीच्या दिवसाची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 12:49 AM2017-10-02T00:49:52+5:302017-10-02T00:50:13+5:30

महागाई, बेरोजगारी, नोटाबंदी, पेट्रोल-डिझेल दरवाढ, शेतकरी आत्महत्या, शेतकरी कर्जमाफी अशा विविध प्रश्नांच्या माध्यमातून सरकारला घेरण्याची विरोधी पक्षाची भूमिका योग्यच आहे

 NCP's movement fails, choose holiday day | राष्ट्रवादीचे आंदोलन फेल, सुट्टीच्या दिवसाची निवड

राष्ट्रवादीचे आंदोलन फेल, सुट्टीच्या दिवसाची निवड

Next

आविष्कार देसाई
अलिबाग : महागाई, बेरोजगारी, नोटाबंदी, पेट्रोल-डिझेल दरवाढ, शेतकरी आत्महत्या, शेतकरी कर्जमाफी अशा विविध प्रश्नांच्या माध्यमातून सरकारला घेरण्याची विरोधी पक्षाची भूमिका योग्यच आहे; परंतु जनतेच्या हितासाठी छेडलेली आंदोलने सुट्टीच्या दिवशी आणि आलिशान वाहनांतून झाली, तर त्या आंदोलनाचे गांभीर्य राहत नाही. जनतेच्या मनातील खदखदत्या प्रश्नांना भिडण्यासाठी आंदोलने रस्त्यावर उतरून करावी लागतात. याचा विसर आंदोलकांना होणे म्हणजेच त्यांची जनतेसोबतची नाळ तुटल्याचे लक्षण म्हणणे योग्य ठरू शकते. याचाच प्रत्यय जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसने छेडलेल्या आंदोलनाच्या बाबतीत दिसून येत आहे.
केंद्रातील आणि राज्यातील तत्कालीन सरकारला सत्तेच्या खुर्चीतून खाली खेचण्यासाठी भाजपाने यातील बहुतांश मुद्द्यांचा आधार घेतला होता. हेच मुद्दे भाजपासाठी ‘गेम चेंजर’ ठरले होते आणि हेच मुद्दे आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह अन्य विरोधी पक्षात असलेल्यांसाठीही ‘गेम चेंजर’ ठरू शकतात. मात्र, विरोधी पक्षाने ते अद्याप गंभीरतापूर्वक घेतल्याचे ते करीत असलेल्या आंदोलनातून दिसून येत नाही. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी सुट्टीच्या दिवशी शेतकरी कर्जमाफीसाठी ‘एल्गार आंदोलन’ छेडले होेते. जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ठरावीक पदाधिकाºयांव्यतिरिक्त फारसे कोणीच नव्हते. पदाधिकाºयांनाही काही तास अगोदरच आंदोलनाची माहिती देण्यात आली होती. प्रदेश कार्यालयाने आंदोलनाची रूपरेषा आधीच निश्चित केल्याचे प्रमोद घोसाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जनेतेच्या प्रश्नांसाठीच हे आंदोलन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १ आॅक्टोबर रोजी रविवार आहे आणि त्या दिवशी कार्यालयीन सुट्टी असते, याची माहिती नियोजन करणाºयांना नव्हती का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने काही महिन्यांपूर्वी आंदोलन केले होते तेही सुट्टीच्याच दिवशी होते. राष्ट्रवादी काँग्रेसला खरेच जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करायची आहे, तर अशी लपून-छपून आंदोलने करण्याची गरज काय? असा प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयातून आंदोलक दुपारी १२ वाजता वाहनातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. त्या वेळी त्यांच्यासोबत ना सर्वसामान्य जनता होती ना त्यांचे आंदोलन जनतेनेही पाहिले. रविवार सुट्टी असल्याने रस्त्यासह कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. जिल्हा प्रशासनास विनंती करून निवेदन घेण्यासाठी कोणीतरी अधिकारी उपलब्ध करून द्या, अशी विनंती केली होती.
सुट्टीच्या दिवशी त्या अधिकाºयाला सकाळपासून कार्यालयात उपस्थित राहावे लागले. त्यांच्या सुट्टीचा खोळंबा केला तो वेगळाच. प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार लोखंडे यांनी निवेदन स्वीकारले.

रविवार सुट्टी असल्याने जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, महसूल विभागाचे तहसीलदार, यांच्यासह अन्य अधिकारी कार्यालयात नव्हते.
त्यामुळे निवेदन स्वीकारण्यास कोणीच नसल्याने जिल्हाध्यक्ष अर्ध्या रस्त्यातून मागे फिरत होते.
मात्र, कार्यकर्त्यांनी आग्रह करून कोणताही अधिकारी निवेदन घेण्यापुरता उभा करावा, अशी मागणी केल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकार विरोधात मोर्चा
१कर्जत : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात रविवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून एल्गार आंदोलन केले. कर्जतमधील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौक ते तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सर्व शेतकºयांची सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी तत्काळ करण्यात यावी, शेतकºयांच्या शेतीमालाचा उत्पादन खर्च व अधिक ५० टक्के नफा मिळवून हमीभाव द्यावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात आणि रब्बी हंगामासाठी पीक कर्ज तातडीने देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन केले होते.२लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकातून निघालेला मोर्चा बाजारपेठेतून शिवाजी पुतळा मार्गे तहसील कार्यालयावर पोहोचला. त्याठिकाणी मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी अच्छे दिन आयेंगे, असा वादा करून भाजपा सरकार सत्तेत आले आणि त्यांनी तीन वर्षांत जनतेची दिशाभूल, फसवणूक केली आहे. सरकारच्या निष्क्र ीयतेमुळेच मुंबई एल्फिस्टन रेल्वेस्थानकात माणसाचा जीव गेला, त्याला सर्वस्वी हेच सरकार जबाबदार आहे. केंद आणि राज्य सरकारने जी आश्वासने निवडणुकीपूर्वी दिली ती तीन वर्षांत पूर्ण करू शकले नाहीत. ३या सरकारने शेतकºयांच्या हिताचे एकही पाऊल उचलले नाही, अशा शब्दांत खरपूस समाचार घेत सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी हा आजचा ट्रेलर होता अजून खूप बाकी आहे. आम्ही जनतेच्या हिताच्या मागण्या करत आहोत त्या पूर्ण झाल्या नाहीतर रस्त्यावर उतरू, असा इशाराही या वेळी त्यांनी दिला. या वेळी आमदार सुरेश लाड, तानाजी चव्हाण आदी उपस्थित होते. या यानंतर शिष्टमंडळाने तहसीलदार अविनाश कोष्टी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
 

Web Title:  NCP's movement fails, choose holiday day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.