फिफा सामन्यांसाठी नवी मुंबई सज्ज, १३ हजार वाहने उभी करण्याची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 02:15 AM2017-10-04T02:15:11+5:302017-10-04T02:15:24+5:30

फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. सुशोभीकरण व प्रसिद्धीसाठीची बहुतांश सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी ५ आॅक्टोबरला स्मार्ट सिटी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

Navi Mumbai ready for FIFA matches, 13 thousand vehicles can be raised | फिफा सामन्यांसाठी नवी मुंबई सज्ज, १३ हजार वाहने उभी करण्याची सोय

फिफा सामन्यांसाठी नवी मुंबई सज्ज, १३ हजार वाहने उभी करण्याची सोय

Next

नवी मुंबई : फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. सुशोभीकरण व प्रसिद्धीसाठीची बहुतांश सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी ५ आॅक्टोबरला स्मार्ट सिटी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, पालिकेच्या यशवंतराव चव्हाण मैदानावर न्यूझिलंडच्या संघाने दोन तास सराव केला. महापालिकेने तयार केलेल्या मैदानाचेही कौतुक केले.
फिफा १७ वर्षांखालील जागतिक फुटबॉल स्पर्धा ६ ते २५ आॅक्टोबर या कालावधीत नवी मुंबईत संपन्न होत आहे. यजमान शहर म्हणून नवी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय व शिक्षण क्रीडा विभागाच्या वतीने महाराष्ट्र फुटबॉल मिशन १ मिलियन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी मनपा आयुक्त रामास्वामी एन. यांच्या अध्यक्षतेखाली गठीत पर्यवेक्षण व सहनियंत्रण समितीची बैठक मंगळवारी मनपा मुख्यालयात घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठीच्या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था, वाहन व्यवस्थेच्या अनुषंगिक बाबींचा आयुक्तांनी सविस्तर आढावा घेतला. जागतिक स्तरावरील ही फुटबॉल स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात देश-परदेशातून प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत.
सामन्यांदरम्यान वाहतुकीचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी वाहनतळाचे योग्य पद्धतीने नियोजन केले आहे. सीवूडमधील गणपतशेठ तांडेल मैदान, ग्रँड सेंट्रल पार्किंग, शिरवणे एमआयडीसीतील रहेला कंस्ट्रक्शनचा भूखंड, एमआयडीसीमधील भूखंड क्रमांक ८, ८बी, १३ बी, उरण फाटा, खारघरमधील लिटील वंडर मॉल, वंडर्स पार्कमध्ये वाहनतळाची व्यवस्था केली आहे. १३ हजार वाहने उभी करता येतील अशी सोय केली आहे. पार्किंगविषयी सविस्तर नियोजनाची माहिती नागरिकांच्या सुविधेसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नवी मुंबई शहराची चांगली प्रतिमा निर्माण व्हावी यासाठी आवश्यक प्रयत्न सुरू आहेत. मनपा मुख्यालयातील बैठकीला अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, रमेश चव्हाण, किरणराज यादव, धनराज गरड, ओवेस मोमीन, तुषार पवार, दादासाहेब चाबुकस्वार, अमरिश पटनिगिरे व इतर अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Navi Mumbai ready for FIFA matches, 13 thousand vehicles can be raised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.