आंतरराष्ट्रीय विमानतळाची डेडलाइन हुकणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:59 AM2017-07-27T00:59:58+5:302017-07-27T01:00:01+5:30

देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाºया नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची डेडलाइन हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

navi mumbai International Airport dont complete on time | आंतरराष्ट्रीय विमानतळाची डेडलाइन हुकणार?

आंतरराष्ट्रीय विमानतळाची डेडलाइन हुकणार?

Next

कमलाकर कांबळे
नवी मुंबई : देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाºया नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची डेडलाइन हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नवी मुंबई विमानतळावरून २०२०मध्ये विमानाचे पहिले उड्डाण होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. सिडकोच्या वरिष्ठ सूत्राने त्यास दुजोरा दिला आहे.
नवी मुंबई विमानतळाला २०१० मध्ये वन आणि पर्यावरण विभागाची पहिली परवानगी प्राप्त झाली. त्यानंतर विमानतळ उभारणीच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या. २०१५ मध्ये विमानतळावरून विमानाचे पहिले उड्डाण होईल, असे जाहीर करण्यात आले होते; परंतु भूसंपादन प्रक्रिया आणि अत्यावश्यक परवानग्या मिळविण्यास विलंब झाल्याने हा प्रकल्प रखडला. मागील आठ वर्षांपासून विविध कारणांमुळे विमानतळाचे काम रखडले आहे. २०१४ मध्ये केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर रखडलेल्या या प्रकल्पाला गती देण्यात आली. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नवी मुंबई विमानतळावरून विमानाचे पहिले टेकआॅफ डिसेंबर २०१९ मध्येच होईल, असे केंद्र व राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले होते; परंतु प्रकल्पाच्या कामाची सध्याची स्थिती पाहता ही डेडलाइन हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रकल्पाला आवश्यक असलेल्या भूसंपादनाचा प्रश्न निकाली निघाला आहे. प्रकल्पामुळे बाधित होणाºया प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. विमानतळाच्या गाभा क्षेत्रात येणाºया दहा गावांच्या स्थलांतराचा प्रश्न काहीसा जटील बनला आहे. येथील ग्रामस्थांनी स्थलांतराची तयारी दर्शविली आहे; परंतु प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झालेली नाही. तसेच सहा महिन्यांपूर्वी सिडकोने विमानतळपूर्व कामांना सुरुवात केली आहे. या कामांसाठी १८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यात उलवे टेकडीची उंची कमी करणे, नदीचे पात्र बदलणे, जमिनीचे सपाटीकरण, उच्च दाबाच्या विद्युतवाहिन्या भूमिगत करणे आदी कामांचा समावेश आहे; परंतु पहिल्या सहा महिन्यांत विविध कारणांमुळे ही कामे प्राथमिक स्थितीतच आहेत. विमानतळपूर्व कामे पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष विमानतळाची उभारणी करण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. या कामासाठी जी.व्ही.के. कंपनीची निविदा पात्र ठरली आहे. त्यावर राज्य मंत्रिमंडळाची अंतिम मोहोर लागणे आवश्यक आहे. सध्या हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पडून आहे. एकूणच विमानतळपूर्व कामांची कासवगती व गाभा क्षेत्रातील गावांच्या स्थलांतराबाबत ग्रामस्थांचा नकारात्मक सूर यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाच्या टेकआॅफची डेडलाइन हुकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दुसºया टप्प्याच्या परवानगीला विलंब
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला वने व पर्यावरण विभागाची पहिल्या टप्प्याची परवानगी १७ नोव्हेंबर २०१०मध्ये मिळाली; परंतु दुसºया टप्प्याच्या परवानगीसाठी चक्क २०१७ उजाडले.
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी दिल्लीत तळ ठोकून सहा महिन्यांपूर्वी ही परवानगी मिळवून घेतली.
त्यानंतर २००० कोटी रुपये खर्चाच्या विमानतळपूर्व कामांच्या वर्कआॅर्डर काढण्यात आल्या.
मागील सात वर्षांत सिडकोने या प्रकल्पासाठी केंद्राकडून पाच महत्त्वपूर्ण परवानग्या मिळविल्या आहेत.

Web Title: navi mumbai International Airport dont complete on time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.