पर्यावरण जनजागृतीसाठी नैनिताल ते गोवा सायकल प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 12:30 AM2019-01-03T00:30:34+5:302019-01-03T00:30:50+5:30

नैनिताल व केरळसह देशभरात येणारे जलप्रलय हे निसर्गाचा तोल ढासळत असल्याचे संकेत आहेत. जंगले वाचविली नाहीत तर भविष्यात अजून गंभीर संकटांना सामोरे जावे लागणार आहे.

Nainital to Goa cycling for environmental awareness | पर्यावरण जनजागृतीसाठी नैनिताल ते गोवा सायकल प्रवास

पर्यावरण जनजागृतीसाठी नैनिताल ते गोवा सायकल प्रवास

Next

- वैभव गायकर

पनवेल : नैनिताल व केरळसह देशभरात येणारे जलप्रलय हे निसर्गाचा तोल ढासळत असल्याचे संकेत आहेत. जंगले वाचविली नाहीत तर भविष्यात अजून गंभीर संकटांना सामोरे जावे लागणार आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज असून, याविषयी जनजागृती करण्यासाठी नैनिताल येथील पर्यावरणप्रेमी भूपेंद्र मेहरा यांनी सायकलवरून भारतभ्रमण सुरू केले आहे.
२०१३ साली उत्तराखंड या ठिकाणी देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा जलप्रलय आला होता. निसर्गावर मात करत मानवाने पर्यावरणाचे संकट आपल्यावर ओढवल्याने सुमारे दहा हजारांपेक्षा जास्त नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. २०१८ मध्ये केरळ राज्यातदेखील जलप्रलय झाले. देशभरात विकासाच्या नावाखाली पर्यावरणाला मोठी हानी पोहोचवली जात आहे. जंगले उद्ध्वस्त केली जात आहेत, खाडीकिनारी भराव टाकला जात आहे आदीसह विविध बाबींमुळे पर्यावरणाचा ºहास होत असल्याने या बाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे सांगत, नैनिताल येथील भूपेंद्र मेहरा यांनी पर्यावरणाचे रक्षण या गंभीर विषयावर जनजागृती करण्यासाठी सायकल प्रवास सुरू केला आहे. नुकतेच ते पनवेलमध्ये दाखल झाले होते. दररोज ६० ते ७० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करतात. सायकलवर, ‘आवो सब मिलकर पर्यावरण बचाये, इस धरती को हरभरा बनाये’ हा संदेश एका पाटीवर कोरला आहे. नैनिताल हलदानी या ठिकाणाहून सुरू केलेल्या प्रवासादरम्यान भूपेंद्र सिंग मेहरा यांनी उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आदी राज्यातील विविध शहरांमधून मार्ग काढत गोवा या ठिकाणी दाखल होणार आहेत. भूपेंद्र यांनी अशाप्रकारच्या आठ सायकल रॅली यापूर्वी देशभरात काढलेल्या आहेत. प्रत्येक नागरिकांनी वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

 

Web Title: Nainital to Goa cycling for environmental awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल