महापालिकेने हटवले १६,००० बॅनर्स

By admin | Published: January 8, 2017 02:54 AM2017-01-08T02:54:18+5:302017-01-08T02:54:18+5:30

महापालिका स्थापन होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. महापालिकेच्या आयुक्तांनी अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र केल्याने शहराचे विद्रूपीकरण काही प्रमाणात थांबले आहे.

Municipal corporation deleted 16,000 banners | महापालिकेने हटवले १६,००० बॅनर्स

महापालिकेने हटवले १६,००० बॅनर्स

Next

- वैभव गायकर,  पनवेल
महापालिका स्थापन होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. महापालिकेच्या आयुक्तांनी अतिक्रमण विरोधी कारवाई तीव्र केल्याने शहराचे विद्रूपीकरण काही प्रमाणात थांबले आहे.
अनधिकृत पत्राशेड, बॅनरबाजीमुळे शहर विद्रूप झाले होते. यामुळे वाहतूककोंडी होत असल्याने नागरिकही हैराण झाले होते. मात्र, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी यासंदर्भात पालिका स्थापनेपासून स्वच्छता मोहीम हाती घेतल्यानंतर पालिका हद्दीतील १६ हजार अनधिकृत बॅनर्स व सुमारे २३०० दुकानांतील पत्राशेड हटवून पनवेलचा श्वास मोकळा केला आहे.
महानगरपालिका क्षेत्रात पनवेल शहरात ५३१, नवीन पनवेलमध्ये १३२५, खांदा वसाहतीत ४७० जणांना महानगरपालिकेने नोटिसा बजावल्या होत्या. त्यांनतर आयुक्तांनी धडक कारवाई मोहीम हातात घेतली. यात सिडको नोडचाही समावेश आहे. आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारताच येथील दुकानदारांनी अतिरिक्त वाढविलेली पत्राशेड स्वत: काढून घेतली. पनवेलच्या इतिहासात आजपर्यंत एवढी मोठी कारवाई झाली नसल्याने शहरातील नागरिकांनी याचे स्वागत केले. विशेष म्हणजे पनवेलपासून ते खारघरपर्यंत तब्बल १६ हजार बॅनर्स काढून काहीजणांवर गुन्हे दाखल केल्याने अनेक ठिकाणी अनधिकृत होर्डिंग बाजीला आळा बसला. आयुक्तांची ही मोहीम आणखी तीव्र होणार आहे. प्रत्येक शहरात आठवडा बाजार भरतो. मात्र, या आठवडा बाजारातून गैरमार्गाने पैसे वसूल करणाऱ्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केल्यांनतर अनेक जणांचे धाबे दणाणले आहेत. महापालिकेच्या अतिक्र मण मोहीम पथकात १५ ते १७ कर्मचारी, २ गाड्यांचा यामध्ये समावेश आहे.

पनवेलमध्ये वर्षानुवर्षे पदपथ, रस्ते याठिकाणी सुरु असलेले अतिक्र मण हटविल्याने शहरात प्रवेश करताना सर्वानाच सुखद अनुभव येत आहे. अनधिकृत हातगाड्यांमुळे होणारी वाहतूककोंडी याबाबतदेखील मोठ्या प्रमाणात बदल जाणवत आहे.

Web Title: Municipal corporation deleted 16,000 banners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.