माजी महापौरांचे पालिका मुख्यालयात आंदोलन, अभिनंदन करणारे वस्त्र परिधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 02:26 AM2019-06-26T02:26:41+5:302019-06-26T02:26:55+5:30

नवी मुंबई महापालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करण्यासाठी माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनी मंगळवारी २५ जून रोजी झालेल्या तहकूब महासभेत अनोखे मूक निदर्शन केले.

Movement of congratulatory clothing, wearing agitation at former municipal headquarters | माजी महापौरांचे पालिका मुख्यालयात आंदोलन, अभिनंदन करणारे वस्त्र परिधान

माजी महापौरांचे पालिका मुख्यालयात आंदोलन, अभिनंदन करणारे वस्त्र परिधान

Next

नवी मुंबई -  नवी मुंबई महापालिकेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करण्यासाठी माजी महापौर सुधाकर सोनावणे यांनी मंगळवारी २५ जून रोजी झालेल्या तहकूब महासभेत अनोखे मूक निदर्शन केले. प्रशासनाला त्यांच्या जबाबदाऱ्यांचा पडलेला विसर लक्षात आणून देण्याच्या उद्देशाने विविध कामांचे अभिनंदन केलेले वस्त्र परिधान करून सोनावणे महासभेला उपस्थित होते.

नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाºया दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणी वर्ग सुरू करण्यात आले होते; परंतु यावर्षी महापालिकेने हे शिकवणी वर्ग बंद केले आहेत. मागील तीन महिन्यांपासून बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. शिक्षणाधिकाºयांची बदली होऊनही ते महापालिकेत घट्टपणे पाय रोवून राहिले आहेत. दोन वर्षांपूर्वी महापालिका शाळेत शिकणा-या विद्यार्थ्याचा अपघात होऊन मृत्यू झाला होता त्याच्या कुटुंबीयांना अद्याप विम्याचा लाभ मिळालेला नाही. डीबीटीसाठी देयके देऊनही शालेय साहित्य अनुदानापासून हजारो विद्यार्थी वंचित आहेत अशा महत्त्वाच्या विषयांना न्याय देण्यासाठी महापालिका प्रशासन उदासीन असून प्रशासनाला विसर पडला असल्याचा आरोप सोनावणे यांनी केला. तसेच सदर विषय वस्त्रावर लिहून प्रशासनाचे अभिनंदन केले.
 

Web Title: Movement of congratulatory clothing, wearing agitation at former municipal headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.