वाळवीग्रस्त गावाच्या पुनर्वसन जागेची अधिकाऱ्यांकडून पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2019 02:56 AM2019-01-09T02:56:07+5:302019-01-09T02:56:35+5:30

५०० हून अधिक बैठका : जसखारमध्ये जागा उपलब्ध करून देण्याच्या हालचाली

Inspection by the authorities of rehabilitation of deserted villages | वाळवीग्रस्त गावाच्या पुनर्वसन जागेची अधिकाऱ्यांकडून पाहणी

वाळवीग्रस्त गावाच्या पुनर्वसन जागेची अधिकाऱ्यांकडून पाहणी

Next

उरण : वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनासाठी उरण तालुक्यातील जसखार महसूल हद्दीतील जागा उपलब्ध करून देण्याबाबत हालचाली शासनाने सुरू केल्या आहेत. उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले यांनी जेएनपीटी अधिकाºयांसह सोमवारी पुनर्वसन होणाºया जागेची पाहणी केली.

वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा गावाचे शासकीय नियम व मानकानुसार पुनर्वसन करण्यात आलेले नाही. उरण शहरातील बोरी-पाखाडी महसूल हद्दीत जेएनपीटीने हनुमान कोळीवाडा गावाचे पुनर्वसन केले आहे. मात्र, अपुºया जागेत झालेल्या पुनर्वसित सर्वच घरांना वाळवीने पोखरले आहे. आवश्यकतेनुसार १७ हेक्टर जागा आणि सोयी-सुविधा उपलब्ध करून त्याठिकाणी पुनर्वसन करण्याची मागणी सातत्याने वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी लावून धरली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयापासून जेएनपीटी, राज्य, केंद्र सरकारपर्यंत पुनर्वसनासाठी ग्रामस्थांनी गेल्या ३२ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. इतक्या वर्षात जवळपास ५०० हून अधिक बैठका झाल्या आहेत. मात्र, वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा न्याय आणि पुनर्वसनापासून अद्यापही वंचित आहे. वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांच्या अन्यायाबाबत वृत्तपत्रांनी आवाज उठवल्यावर शासनाने गावाच्या पुनर्वसनासाठी नव्याने उरणमधील जसखार महसूल हद्दीतील जागा उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
वाळवीग्रस्त हनुमान कोळीवाडा गावाच्या पुनर्वसनासाठी आवश्यक जागेची सोमवारी उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पाहणी करण्यात आली. या वेळी जेएनपीटी
अधिकारी राजेश म्हात्रे, उरण तहसीलदार कविता गोडे, हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ, मंडळ अधिकारी, तलाठी आदी उपस्थित होते. पाहणीचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले आणि जेएनपीटी अधिकारी राजेश म्हात्रे यांनी दिली.
 

Web Title: Inspection by the authorities of rehabilitation of deserted villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.