पेण येथील पिंपळपाडा गोठ्यात काम करणाऱ्या चार मनोरुग्णांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 05:42 AM2019-06-27T05:42:06+5:302019-06-27T05:42:26+5:30

पेण तालुक्यातील पिंपळपाडा येथील एका गोठ्यात काम करणाºया आठ जणांची सुटका बुधवारी सुटका करण्यात आली.

Four released at Pimpalpada Ground in Pen | पेण येथील पिंपळपाडा गोठ्यात काम करणाऱ्या चार मनोरुग्णांची सुटका

पेण येथील पिंपळपाडा गोठ्यात काम करणाऱ्या चार मनोरुग्णांची सुटका

Next

अलिबाग : पेण तालुक्यातील पिंपळपाडा येथील एका गोठ्यात काम करणाºया आठ जणांची सुटका बुधवारी सुटका करण्यात आली. पुण्याच्या स्माइल प्लस फाउंडेशनने पोलिसांच्या मदतीने केली आहे. आठपैकी चार जण मनोरुग्ण असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले.
पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता चार मनोरुग्णांची रवानगी ठाणे येथील मनोरुग्णालयात करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करवून घेणाºया विरोधात पोलीस काय कारवाई करणार हा खरा प्रश्न आहे.
पेण तालुक्यातील पिंपळपाडा येथील एका गोठ्यामध्ये गेल्या तीन वर्षांपासून मनोरुग्णांकडून जबरदस्तीने काम करवून घेतले जात असल्याची माहिती स्माइल प्लस फाउंडेशनचे अध्यक्ष योेगेश मालखरे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह तेथे धाव घेतली. गोठ्यामध्ये विचित्र परिस्थितीमध्ये त्या व्यक्ती काम करताना दिसून आल्या. त्यानंतर मालखरे यांनी पेण पोलिसांच्या मदतीने गोठ्यात काम करणाºया आठ लोकांची सुटका केली. याबाबत गोठ्याच्या मालकाला विचारणा केल्यावर आम्ही त्यांना सांभाळतो, खायला प्यायला देतो असे सांगितल्याचे मालखरे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणले. आठपैकी चार हे मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न झाले. चार मनोरुग्णांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांची रवानगी मनोरुग्णालयात करण्याचे आदेश दिले. उर्वरित चार जणांचा ताबा मागणाºयांना न्यायालयाने चांगलेच खडसावल्याचेही मालखरे म्हणाले.
गोठ्यात काम करणाºया व्यक्ती या बिहार, मद्रास या परराज्यातील तर एक जण नेपाळ देशातील आहे. त्यामुळे पर जिल्ह्यातील आणि परदेशातील व्यक्ती या महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील एकाच गावात आणि एकाच कुटुंबाकडे कामाला कसे असू शकतात असा संशय मालखरे यांनी व्यक्त केला.

स्माइल प्लस फाउंडेशनच्या तक्रारीनंतर पिंपळपाडा येथून आठ जणांची सुटका केली आहे. त्यातील चार मनोरुग्णांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांची रवानगी ठाणे येथील मनोरुग्णालयात करण्याचे आदेश दिले आहेत.
- धनाजी क्षीरसागर, पोलीस निरीक्षक, पेण पोलीस ठाणे

Web Title: Four released at Pimpalpada Ground in Pen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.