पनवेलमध्ये खाद्यमहोत्सवाला वीजपुरवठा करणाऱ्या जनरेटरला आग 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 08:39 PM2019-01-12T20:39:32+5:302019-01-12T20:39:51+5:30

इनरव्हील क्लब पनवेलच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या खाद्यमहोत्सवाला वीजपुरवठा करणा-या जनरेटरला आग लागल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली.

Fire in generator for generating electricity for food festival in Panvel | पनवेलमध्ये खाद्यमहोत्सवाला वीजपुरवठा करणाऱ्या जनरेटरला आग 

पनवेलमध्ये खाद्यमहोत्सवाला वीजपुरवठा करणाऱ्या जनरेटरला आग 

Next

पनवेल - इनरव्हील क्लब पनवेलच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या खाद्यमहोत्सवाला वीजपुरवठा करणा-या जनरेटरला आग लागल्याची घटना शनिवारी सायंकाळी  ७. ३० वाजता घडली .अग्निशमनाचे पथक घटनास्थळी येण्यापूर्वीच जनरेटर जळून खाक झाले होते . 
       विशेष म्हणजे हे जनरेटर ठेवलेली गाडी देखील यावेळी जळाल्याचे पहावयास मिळाले . आग विझविण्यासाठी आयोजकांकडून कोणतीच यंत्रणा ठेवली नसल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यास उशीर झाला . पनवेल महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या मार्फत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले . या घटनेमुले गुजराथी शाळेसमोरील परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती . या घटनेमुळे सर्व खाद्य महोत्सवातील सर्व स्टोल्स बंद ठेवण्यात आले होते .

Web Title: Fire in generator for generating electricity for food festival in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.