अमृत योजनेमुळे पडीक जागांवर फुलली हिरवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 01:32 AM2019-03-15T01:32:16+5:302019-03-15T01:32:22+5:30

१५ हजार नवीन झाडे; उद्यानांमध्ये भर

Elf plan | अमृत योजनेमुळे पडीक जागांवर फुलली हिरवळ

अमृत योजनेमुळे पडीक जागांवर फुलली हिरवळ

Next

- योगेश पिंगळे

नवी मुंबई : केंद्र शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणारे अमृत योजनेमुळे नवी मुंबई शहरातील नेरु ळ, सानपाडा, वाशी आणि घणसोली येथील हिरवळीसाठी आरक्षित असलेल्या, परंतु पडीक पडलेल्या जागांवर हिरवळ दाटली आहे. या योजनेअंतर्गत विविध फळे आणि फुलांची सुमारे १५ हजार झाडे लावण्यात आली असून यामुळे शहराच्या उद्यानांमध्ये देखील भर पडली आहे.

नवी मुंबईत महापालिकेच्या माध्यमातून शेकडो उद्याने विकसित करण्यात आली आहेत. याठिकाणी ओपन जिम, जॉगिंग ट्रॅक, खेळणी आदी सुविधा देण्यात येत असल्यामुळे नागरिकांनी देखील पसंती दिली आहे. देशातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारावा तसेच देशात स्वच्छ, शाश्वत व पर्यावरणपूर्वक शहरे तयार व्हावीत शहरामधील मोकळ्या जागांवर हरित क्षेत्र निर्माण व्हावे यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून देशातील विविध शहरांमध्ये अमृत योजना राबविण्यात आली आहे. या योजनेसाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून ७५ टक्के राज्य शासनाकडून २५ टक्के आणि महापालिकेचा २५ टक्के निधी वापरला जातो. सदर योजना राज्यातील सुमारे ४३ शहरांमध्ये राबविण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेने पडीक भूखंडांवर जास्तीत जास्त वृक्षारोपण करून आंबा, निम, नारळ, सुपारी, काजू, चिकू, पेरू आदी फळझाडे आणि फुलझाडे लावली आहेत. २0१५-१६ मध्ये नेरु ळ सेक्टर २६ मधील ज्वेल पार्क येथे सुमारे १२ हजार चौरस मीटर जागेवर हरित क्षेत्र निर्माण करून सुमारे १९२४ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. २0१६ - १७ मध्ये घणसोली सेक्टर ९ येथे नाल्यालगत आरक्षित आणि पडीक सुमारे १२ हजार चौरस मीटर क्षेत्रात हरित क्षेत्र निर्माण करून सुमारे ३८४५ वृक्षांची लागवड केली आहे.

२0१७ - १८ मध्ये सानपाडा सेक्टर ३0 ए आणि वाशी सेक्टर १0 ए या दोन्ही ठिकाणी सुमारे १५ ते १८ हजार चौरस मीटर क्षेत्रात सुमारे ८९६८ वृक्षांची लागवड केली. याशिवाय नागरिकांसाठी नैसर्गिक पदपथ तयार करण्यात आला असून लॉन विकसित करण्यात आली आहे. विविध झाडांच्या जाती, त्यांची नावे, फायदे, झाडांमुळे येणारे विविध पक्षी, फुलपाखरे याबाबत माहिती असलेले फलक बसविण्यात आले आहेत. अमृत अभियानामुळे शहरात वृक्षांची संख्या वाढली असून शहरातील उद्यानामध्ये देखील भर पडली आहे.

Web Title: Elf plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.