राज ठाकरेंच्या पनवेल दौऱ्यामुळे मनसैनिकांत उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 05:55 AM2018-05-14T05:55:24+5:302018-05-14T05:55:24+5:30

मनसेचे अध्यक्ष राज  ठाकरे रायगड दौ-यावर जाणार आहेत.

Due to Raj Thackeray's Panvel tour | राज ठाकरेंच्या पनवेल दौऱ्यामुळे मनसैनिकांत उत्साह

राज ठाकरेंच्या पनवेल दौऱ्यामुळे मनसैनिकांत उत्साह

googlenewsNext

पनवेल : मनसेचे अध्यक्ष राज  ठाकरे रायगड दौ-यावर जाणार आहेत. या दरम्यान ते बुधवारी पनवेल येथे मुक्कामी असणार
असून गुरुवारी सकाळी येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात ते कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पनवेल येथील गार्डन हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असणार आहे. राज ठाकरे पनवेलला येत असल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाºयांत उत्सुकता लागून राहिली आहे.
आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या पनवेलमधील मुक्कामाला महत्त्व प्राप्त झाले आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. पालघरपासून या दौºयाला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी रायगडला पसंती दिली आहे. या दौºयाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला अतुल भगत
यांच्यासह विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष अक्षय काशिद, पनवेल
शहर अध्यक्ष केदार सोमण, गणेश बनकर आदींसह मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Due to Raj Thackeray's Panvel tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.